Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) लोकसभेतील भाषणात भाजपा आगामी निवडणुकीत 370 आणि एनडीए 400 आकडा पार करील असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर पहिल्यांदाच (Lok Sabha Election 2024) एक देशव्यापी सर्वे समोर आला आहे. इंडिया टूडेने केलेल्या सर्वेत उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपा यंदाही आघाडीवर राहिल अस चित्र दिसत आहे. या सर्वेत पीएम मोदी यांचा दावा बऱ्याच अंशी खरा ठरताना दिसत आहे. या सर्वेत उत्तर प्रदेशातील आकडे थक्क करणारे असेच आहेत.
भाजपला 72, इंडिया आघाडीला फक्त 8 जागा
या सर्वेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील जनतेचा मूड कसा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्वेनुसार, भाजप नेतृत्वातील एनडीए (NDA) उत्तर प्रदेशातील 80 पैकी तब्बल 72 जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडी (INDIA Alliance) फक्त 8 जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये एकटा भाजप 70 जागांवर विजयी होऊ शकतो. तसेच सहकारी अपन दल 2 जागांवर विजय मिळवू शकतो अशी परिस्थिती आहे.
Lok Sabha 2024 : ‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का, मोठा नेता साथ सोडणार?; शिवपाल यादवांनी स्पष्टच सांगितलं
या निवडणुकीत भाजप मागील 2019 च्या निवडणुकीतील मतांची टक्केवारी (50 टक्के) कायम राखेल. अपना दल पक्षाला दोन टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत अपना दलाच्या मतांच्या टक्केवारीत एक टक्का घट होताना दिसत आहे. अयोध्येत नुकतेच राम मंदिर उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली. याचाही फायदा भाजपला निवडणुकीत होईल असे सांगण्यात येत आहे.
सपा-बसपाला जबर दणका, मतांची टक्केवारी घटणार
विरोधी आघाडीतील काँग्रेस 6 टक्के, समाजवादी पार्टी 30 टक्के, बसपा 8 टक्के आणि अन्य पक्षांना 12 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यंदा समाजवादी पार्टी आणि बसपा या दोन्ही पक्षांना फटका बसताना दिसत आहे. मागील निवडणुकीत सपाला 39 तर बसपाला 19 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत इंडिया आघाडीला 36 टक्के आणि एनडीए आघाडीला 52 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशात शतप्रतिशत भाजप
देशात उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. त्यामुळे या राज्यावर सगळ्याच पक्षांचे लक्ष असते. मात्र मागील काही वर्षांपासून भाजपाने या राज्यात मजबूत पकड तयार केली आहे. टाइम्स नाऊ-नवभारतने केलेल्या सर्वेतही येथे विरोधी आघाडी सपाटून मार खाताना दिसत आहे. या राज्यातील 80 पैकी 77 जागांवर भाजप युती विजयी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विरोधी सपा, काँग्रेस आघाडीला फक्त तीन जागा मिळतील. तर बहुजन समाज पक्षाला खातेही उघडता येणार नाही, असा अंदाज टाइम्स नाउ नवभारतच्या सर्वेत व्यक्त करण्यात आला आहे.
Lok Sabha 2024 : सोनिया गांधी तेलंगाणातून लोकसभा लढणार? CM रेड्डींनी काय सांगितलं