Download App

अबब ! पंधराशे आयफोन लुटले; रस्त्यात कंटेनर अडवून साधला डाव, पोलिसही आले अडचणीत

या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तर दोन कर्मचाऱ्यांना मुख्यालयात हजर करण्यात आले आहे.

  • Written By: Last Updated:

Madhya Pradesh 1500 I phones worth11-crore stolen from truck in Madhya Pradesh : देशामध्ये महामार्गावर ट्रक अडवून माल लुटल्याच्या घटना सातत्याने घडतात. पण आता मध्य प्रदेशात ११ घरांवर बुलडोझर कारवाई; फ्रिजमध्ये बीफ ठेवल्याचा आरोप, एकाला अटकमधील (Madhya Pradesh) सागर जिल्ह्यात एक मोठी लुटीची घटना घडलीय. एक कंटेनरमधून चोरट्यांनी तब्बल 11 कोटीची किंमतीचे 1500 आयफोन (I phones) चोरून नेले आहेत. या प्रकरणी पोलिस चौकशी करत आहेत. हे प्रकरण आता काही पोलिसांच्या अंगलट आले आहेत. तीन पोलिसांची चौकशी सुरू करण्यात आली असून, एका पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे.

“दोषींवर कठोर कारवाई करा”, रेल्वेतील ‘त्या’ मारहाणीच्या घटनेची अजितदादांनी घेतली दखल

ही घटना 15 ऑगस्ट रोजीची असून, हे प्रकरण आता समोर आले आहे. ट्रकचालकाला नशेचा पदार्थ खाऊ गालून त्याला बेशुध्द करण्यात आले. त्यानंतर कंटेनरमधील सर्व फोन चोरून नेण्यात आले. 11 कोटी रुपये किंमतीचे पंधराशे रुपयांचे आयफोन लुटले गेल्याचे ट्रान्सपोर्ट कंपनीकडून सांगण्यात आले आहे. परंतु फोनची निर्मिती करणाऱ्या अॅपल कंपनीने अद्याप आमच्याशी संपर्क केलेला नाही. सागर जिल्ह्यापासून 35 किलोमीटर अंतरावर ही घटना घडलेली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय उइके यांनी दिली आहे.

National Nutrition Week | राष्ट्रीय पोषण सप्ताहाचं महत्व काय? जाणून घ्या खास थीम अन् फायदेही..

या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तर दोन कर्मचाऱ्यांना मुख्यालयात हजर करण्यात आले आहे. या तिघांकडे सध्या चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षक या दोघांकडून पोलिस ठाण्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे., त्यांना मुख्यालयात हजर करण्यात आले आहे. कंटेनर लुटल्यानंतर चालकाने याबाबत पोलिस ठाण्यात संपर्क केला होता. परंतु पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याच्या तक्रारीची दखल घेतली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

कंटेनर हा हरियाणातून गुरुग्राम येथून चेन्नईला जात होता. सागर जिल्ह्यात आल्यानंतर कंटेनर लुटण्यात आला आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशी झाली आहे. या प्रकरणी पूर्ण चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

follow us