National Nutrition Week | राष्ट्रीय पोषण सप्ताहाचं महत्व काय? जाणून घ्या खास थीम अन् फायदेही..
National Nutrition Week 2024 : भारतात पोषणाच्या स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने (National Nutrition Week) तसेच लोकांनी हेल्दी लाईफस्टाईलचा अंगीकार करावा यासाठी दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर या काळात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. आजपासून देशभरात हे अभियान सुरू झाले आहे. या सात दिवसांच्या काळात पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतात आजही कुपोषणाची समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. तरी देखील ही समस्या आहेच. राष्ट्रीय पोषण सप्ताह सुद्धा या प्रयत्नांचा एक भाग आहे. हा सप्ताह साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करणे तसेच त्यांना पौष्टिक आहार घेण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.
राष्ट्रीय पोषण आहार थीम
यावर्षी राष्ट्रीय पोषण आहाराची थीम पोषण आहार सर्वांसाठी अशी आहे. या थीमचा मुख्य उद्देश लोकांच्या पोषण संबंधी आवश्यक गरजा पूर्ण करणाऱ्या संतुलित आणि विविध प्रकारच्या आहाराला प्रोत्साहन देणे हा आहे. ही थीम प्रत्येक वर्गातील व्यक्तीच्या पोषणाची उपलब्धता सुनिश्चित करण्याला प्राधान्य देते. या उद्देशाने यंदा खास थीम निश्चित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पोषण सप्ताहाचे महत्त्व
या सप्ताहात लोकांना पोषणा संबंधी जागरूक करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे.
पोषणाच्या बाबतीत अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. या सप्ताहाच्या माध्यमातून हे गैरसमज दूर करता येतील.
या सप्ताहाच्या माध्यमातून लोकांना संतुलित आहार घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
या सप्ताहाच्या माध्यमातून लोकांच्या पोषण विषयक समस्या काय आहेत याची माहिती घेतली जाते. त्यानुसार या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.
दर सोमवारी उपवास, सकाळी योगा..कशी आहे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांची लाइफस्टाईल?
तुम्ही काय करू शकता
पोषणाच्या बाबतीत जास्तीत जास्त माहिती गोळा करा.
स्वतः संतुलित आहार घ्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही संतुलित आहार घेण्यासाठी प्रोत्साहित करा.
आपल्या आसपासच्या लोकांना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून द्या.
राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या सरकारी कार्यक्रमांत सहभागी व्हा.
‘या’ गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा
संतुलित आहारात सर्व आवश्यक पोषक तत्व जसे की कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिज यांचा समावेश असतो.
धान्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे आहारात सेवन करा.
जंक फूड आणि गोड खाद्य पदार्थ जितके टाळता येतील तितके टाळा. शक्यतो या पदार्थांपासून लांब राहा.
नियमितपणे व्यायाम करणे सुद्धा चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे तेव्हा तुम्ही रोज व्यायाम करणे चांगले आहे.
सुका मेवा, ओट्स, मूग डाळ, हिरव्या पालेभाज्या, दही, जवस, सोयाबीन यांचा तुमच्या आहारात समावेश करा.