दर सोमवारी उपवास, सकाळी योगा… कशी आहे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांची लाइफस्टाईल?
DY Chandrachud Lifestyle: देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (DY Chandrachud Lifestyle) यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या खटल्यांवर ऐतिहासिक निकाल दिले आहेत. चंद्रचूड यांनी खंबीरपणे आणि तटस्थ निकाल देत सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे देशभरात डी. वाय. चंद्रचूड यांचे नाव चर्चेत आलं. त्यांच्या विषयी सर्वांच्या मनात कमालीचा आदर आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. दरम्यान, त्याच विषयी जाणू घेऊ.
अखेर मनसेचंही ठरलं! शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मैदानात उतरणार…
चंद्रचूड यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, ते आपल्या दिवासाची सुरूवात सकाळी साडेसात वाजता करतात. सकाळी शांत वातावरणर असते. अशा वातावरणात ते अनेक विषयांवर विचार करतात आणि योगा करतात. गेल्या 25 वर्षांपासून ते योगा करत आहेत.
डीवाय चंद्रचूड आपल्या पत्नीला आपली सर्वात चांगला मित्र मानतात. त्यांच्या पत्नीचे नाव कल्पना दास आहे. त्या वकील आहेत. त्यांनी दोन मुलींना दत्तक घेतलं. एकीचे नाव माही आणि दुसऱ्या मुलीचे नाव प्रियांका आहे. कल्पना दास या चंद्रचूड यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. ते म्हणाले की, मी माझ्या पत्नीसोबत आयुर्वेदिक डायट घेतो. आम्ही दोघे शाकाहारी आहोत. आमची जीवनशैली जास्त करून वनस्पतींवर आधारित आहे. ते म्हणाले की, मला वाटतं की, आपण जे काही खातो, त्याचा प्रभाव आपल्या विचारांवर होत असते. तुमची तंदुरुस्ती तुमच्या आतून येते. यासाठी तुमचे मेंदू आणि मन चांगलं ठेवायला हवं.
Lok Sabha Election : बंगाल, बिहार, झारखंड अन् महाराष्ट्र, राजकीय वादाचा फायदा कुणाला ?
माझे जीवन इतरांपेक्षा वेगळे नाही. आयुष्यात चढ-उतार येत असतात. मी माझ्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगही पाहिले आहेत. या समस्यांतून पुन्हा उभारी घेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगाचा एक उद्देश असतो. याची जाणीव आपल्याला पुढं होते.
25 वर्षांपासून उपवास
चंद्रचूड म्हणाले की, ते दर सोमवारी उपवास करतात. महाराष्ट्रामध्ये उपवासासाठी शाबुदाणा खिचडी खाल्ली जाते. मी राजगिरा खातो. मी गेल्या 25 वर्षांपासून सोमवारी उपवास करतो. जर तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू शकलात तर तुमच्या अर्ध्या समस्या कमी होतील. पण मी कधी कधी आईसक्रीम खातो, असंही चंद्रचूड म्हणाले.
तर २०१९ मध्ये मुंबईतील एका कार्यक्रमात ते म्हणाले होते की, मला वाचनाची आवड आहे. ते रात्री ८ वाजल्यापासून १ ते २ तास अभ्यास करतात. सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पाश्चात्य संगीत ऐकायला आवडते. ‘कोल्डप्ले’ आणि ख्रिस मार्टिनसारख्या गायकांची गाणी त्यांना आवडतात.