अखेर मनसेचंही ठरलं! शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मैदानात उतरणार…

अखेर मनसेचंही ठरलं! शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मैदानात उतरणार…

Lokabha Election : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापू लागलं आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून मॅरेथॉन बैठकी घेतल्या जात आहेत. अशातच मुंबईतील ताज हॉटेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) उपस्थित होते. मनसे महायुतीत सामिल झाल्यानंतर मनसेचे उमेदवार शिवेसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ट्रिपल इंजिन सरकारला मनसेचं इंजिनही जोडल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

मोठी बातमी : निवडणुकांच्या तोंडावर मोदींना दिलासा; ECs नियुक्ती कायद्यावर बंदी घालण्यास SC चा नकार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही दंड थोपटण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दौरा करत आढावा घेतला होता. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत राज ठाकरे स्पष्ट करणार होते.

ISRO Award : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; ISRO ला अवकाश क्षेत्रातला मानाचा पुरस्कार

मात्र, अचानक दोन दिवसांपासून राज ठाकरेंनी जोरदार हालचाली सुरु केल्या. राज ठाकरे यांनी दिल्लीत जात केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महायुतीत सामिल होण्याबाबत राज ठाकरे यांच्यात आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली. या भेटीनंतर सकारात्मक चर्चा झाली असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलं होतं.

अमित शाह यांच्या भेटीनंतर आज मुंबईतील ताज हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर मनसे महायुतीत सामिल होणार की नाही? याबाबत स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, महायुतीकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभेच्या दोन मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात. मुंबईतून अमित ठाकरे तर शिर्डीतून बाळा नांदगावकर हे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज