Download App

Video : ट्रक चालकांची ‘औकात’ काढणं अंगलट; CM मोहन यादवांकडून जिल्हाधिकाऱ्यांची हकालपट्टी

Madhya Pradesh News : हिट अॅंड रन (Hit & Run Law) कायद्याविरोधात ट्रकचालकांनी पुकारलेल्या आंदोलनाप्रकरणी मध्य प्रदेशातील शाजापूरचे जिल्हाधिकारी किशोर कन्याल (Kishor Kanyal) यांनी ट्रकचालकांची औकात काढून भर सभेत सुनावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांच्याकडून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची हकालपट्टीचं करण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून भारतीय न्याय संहिता हिट अॅंड रन कायद्यात अनेक बदल केले आहेत. कायद्यात केलेल्या बदलांमुळे केंद्र सरकारविरोधात देशातील ट्रकचालकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अनेक राज्यांत ट्रकचालकांनी संप पुकारुन चक्काजाम आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं आहे. यासंदर्भातच चर्चा करण्यासाठी शाजापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत जिल्हाधिकारी आणि ट्रकचालकांची चर्चा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनूसार ट्रकचालकांना उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले, ट्रकचालक कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाहीत. इथं व्यवस्थित संवाद साधायचा, तुम्ही काय बोलतात याच भान ठेवा…नाहीतर काय करणार तुम्ही काय औकात आहे तुमची, अशी लढाई नसते, या शब्दांत जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांनी ट्रकचालकांना खडसावलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून अदानींना मोठा दिलासा, हिंडनबर्ग प्रकरण SIT कडे सोपवण्यास स्पष्ट नकार

तसेच ट्रकचालकांसोबत चर्चा करतानाच जिल्हाधिकारी म्हणतात, ‘काय म्हणतोयस… एवढं लक्षात ठेव. तू काय करशील… तुझी स्थिती काय आहे? असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांनी केलायं. त्यावर ट्रकचालकांनी प्रत्युत्तरात म्हणाले, साहेब हीच गरज आहे. आमची अजिबात स्थिती नसल्याचं ट्रकचालकांने उत्तर दिलं आहे. यासंदर्भातील संवाद व्हिडिओमध्ये दिसत आहे.

प्रत्येकाच्या कामाचा आदर केला पाहिजे :
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करत त्यांना जिल्हाधिकारी पदावरून हटवले. ‘हे सरकार गरिबांचे सरकार असून प्रत्येकाच्या कामाचा आदर केला पाहिजे. आम्ही सतत गरिबांची सेवा करत आहोत. ‘माणूस म्हणून अशी भाषा आपल्या सरकारमध्ये खपवून घेतली जाणार नाही. मी स्वतः मजूर कुटुंबातील मुलगा आहे. अशी भाषा बोलणे योग्य नाही. अधिकाऱ्यांची भाषा आणि वागणूक याकडे लक्ष द्या, असं मोहन यादव म्हणाले आहेत.

follow us

संबंधित बातम्या