Bulldozer Action in MP : यूपीनंतर आता मध्य प्रदेशमध्ये बुलडोझरची ‘दहशत’…

Bulldozer Action in MP : यूपीनंतर आता मध्य प्रदेशमध्ये बुलडोझरची ‘दहशत’…

Bulldozer Action in MP: मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh)गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. महापालिकेनं एका गुन्हेगाराचं अवैध घर बुलडोझरच्या (Bulldozer)मदतीनं जमीनदोस्त केलं. डॉ.मोहन यादव (Dr. Mohan Yadav)मुख्यमंत्री झाल्यानंतर बुलडोझरची ही पहिलीच कारवाई आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal)ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता उत्तरप्रदेशनंतर (Uttar Pradesh)मध्यप्रदेशमध्येही बुलडोझरची ‘दहशत’ दिसून येत आहे.

Sonu Sood च्या चाहत्यांचं अनोखं गिफ्ट; ‘मैं भी सोनू सूद’ मोहिमेनी गाठली मुंबई

मध्यप्रदेश विधानसभेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये भाजपनं बाजी मारली आणि डॉ.मोहन यादव यांची मुख्यमंत्रिदी नियुक्ती झाली. डॉ. मोहन यादव यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन कामाला सुरुवात केली आहे.

प्रसिद्धी मिळाल्यानं जरांगेंच्या डोक्यात हवा, भुजबळांना मारण्याची धमकी; समीर भुजबळांचा गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी राजधानी भोपाळमध्ये फारुख रैन नावाच्या कथित काँग्रेस नेत्यानं भाजप कार्यकर्ता देवेंद्र ठाकूर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यांनी तलवारीने देवेंद्र ठाकूर यांचे तळवे कापले होते. यानंतर राजधानी पोलिसांनी आरोपी फारुख रैनला अटक करुन त्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

त्यानंतर आरोपी फारुक हा भोपाळ सेंट्रलचे आमदार आरिफ मसूदसाठी काम करायचा अशी जोरदार चर्चा होती. तर देवेंद्र हे भाजपचे नेते आहेत. निवडणुकीदरम्यानच दोघांमध्ये वैर निर्माण झालं होतं. काँग्रेसचे उमेदवार आरिफ मसूद यांनी निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर फारुख यांनी देवेंद्र यांच्यावर हल्ला केला.

मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी नुकतीच 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दुसऱ्याच दिवशी भोपाळमध्ये बुलडोझर फिरू लागला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपींनी अतिक्रमण करुन घर बांधले होते. महापालिकेच्या नियमांचेही उल्लंघन झाले होते. त्यामुळे त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.

शहरातील काही मांस दुकानांना टाळं ठोकल्यानंतर महापालिकेच्या पथकानं घोषणा करून सर्वांना उघड्यावर मांसविक्री न करण्याचा सल्ला दिला होता. महापालिका अतिरिक्त आयुक्त राधेश्याम मंडलोई यांनी सांगितलं की, शासनाच्या सूचनेनुसार शहरातील नागझरी परिसरात विनापरवानगी सुरू असलेल्या मांस दुकानांवर कारवाई करण्यात आली. शहरातील इतर भागातही महापालिकेकडून कारवाई सुरु केली आहे.

उघड्यावर मांसविक्री करणाऱ्या सुमारे 10 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूची काही दुकानंही पाडल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महापालिकेने घटनास्थळावरून साहित्यही जप्त केले. दरम्यान, अधिकार्‍यांच्या पथकाने शहरातील आर्टिलरी परिसर आणि महाकालेश्वर मंदिराजवळील बेगमबाग परिसरातील मांस दुकानदारांना इशारा दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube