Download App

Video : मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला; 9 जणाांचा मृत्यू

Gujarat Bridge Collapse :  गुजरातमधील महिसागर नदीवरील (Mahisagar River) पूलचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

Gujarat Bridge Collapse :  गुजरातमधील महिसागर नदीवरील (Mahisagar River) पूलचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, पुलाचा काही भाग कोसळल्याने (Bridge Collapse) तीन वाहने देखील नदीत पडली आहे. सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

माहितीनुसार, पड्रा (Padra) तालुक्यातील मुजपूर (Muzpur) येथे असणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की, एक टँकर तुटलेल्या पुलावरुन खाली पडताना लटकलेल्या अवस्थेत आहे. तर नदीत अडकलेली एक महिला मदतीसाठी ओरडत आहे. सध्या या दुर्घटनेत किती लोक जखमी झाले किंवा बेपत्ता झाले आहेत याबाबात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून 6 पेक्षा जास्त लोक जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

वडोदराचे जिल्हाधिकारी अनिल धामेलिया (Anil Dhamelia) म्हणाले की, आज सकाळी बचाव कार्य सुरू झाले. स्थानिक, बोटी आणि महानगरपालिकेची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. व्हीएमसी, आपत्कालीन सेवा, एनडीआरएफ पथके आणि इतर प्रशासकीय अधिकारी पोलिस पथकांसह येथे उपस्थित आहेत. बचाव कार्य सुरू आहे. आम्ही आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढले आहेत. 5 जण जखमी आहेत, सहावा जखमी नुकताच सापडला आहे आणि त्याला वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. असं वडोदराचे जिल्हाधिकारी अनिल धामेलिया म्हणाले.

जखमींची यादी

1. सोनलबेन रमेशभाई पढियार, वय 45, गाव-दरियापुरा

2. नरेंद्रसिंग रतनसिंग परमार, वय 45, गाव-देहवण

3. गणपतसिंग खानसिंग राजुला, वय 40, गाव-राजस्थान

4. दिलीपभाई रामसिंग पडियार, वय 35, गाव-नानी शेरडी

5. राजूभाई दुदाभाई, वय 30, गाव-द्वारका

6. राजेशभाई ईश्वरभाई चवडा, वय 45, गाव-देवपुरा

मोठी बातमी! तुकडे बंदी कायदा रद्द होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा

मृतांची यादी

1. वैदिक रमेशभाई पढियार, वय 45, गाव-दरियापुरा

2. नाईक रमेशभाई पढियार, वय 45, गाव-दरियापुरा

3. हसमुखभाई महीजीभाई परमार, वय 32 वर्षे, गाव-माजतन

4. रमेशभाई दलपतभाई पढियार, वय 32 वर्षे, गाव-दरियापुरा

5. वखासिंग मनुसिंग जाधव, वय 26, गाव-कान्हवा

6. प्रविणभाई रावजीभाई जाधव, वय 26, गाव-उंडेल

7. अज्ञात व्यक्ती

8. अज्ञात व्यक्ती

follow us