Cash For Query : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या (Cash For Query) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडणचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात मोईत्रा यांची खासदारकी जाईल की (Mahua Moitra) राहिल याचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे. संसदेच्या समितीची बैठक आज होणार आहे. या बैठकीत समिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस करू शकते अशी शक्यता आहे. संसदेच्या आचार समितीत एकूण 15 सदस्य आहेत. यामध्ये भाजपाचे सात, काँग्रेसचे तीन आणि बसपा, शिवसेना, वायएसआर काँग्रेस, माकपा, आणि जेडीयू पक्षांचे प्रत्येकी एक खासदाराचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणावर समितीने 500 पानांचा अहवाल तयार केल्याची माहिती आहे. विरोधी पक्षांचे मतभेद असूनही संसदेच्या या समितीने अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे कारवाईची शिफारस केली आहे.
Cash For Query : ‘सरकारकडून माझा फोन हॅक करण्याचा प्रयत्न’ महुआ मोईत्रांच्या आरोपाने खळबळ!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे एन. उत्तमकुमार रेड्डी आणि व्ही. वैथलिंगम एथिक्स कमिटीच्या अहवाालावर असहमती व्यक्त करू शकतात. त्याचवेळी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह परनीत कौर मत मांडू शकतात. याशिवाय बसपा खासदारही असहमती व्यक्त करू शकतात. याआधी या समितीची बैठक 2 नोव्हेंबर रोजी झाली होती. या बैठकीत विरोधी पक्षातील काही सदस्यांनी समिती प्रमुख विनोदकुमार सोनकर यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. मोईत्रा यांना प्रश्न विचारल्याने विरोधी पक्षांचे पाच सदस्य सोनकर यांच्यावर संतापले होते. सोनकर यांनी खासदार मोईत्रा यांना वैयक्तिक प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला होता.
विरोधी सदस्यांचे वॉकआउट
विरोधी खासदार गिरधारी यादव, दानिश अली, उत्तम रेड्डी, नटराजन, वैथलिंगम यांनी समितीतून वॉकआउट केले होते. सभेतून बाहेर आल्यानंतर महुआ मोईत्रा चांगल्याच संतापल्या होत्या. तसेच बसपा खासदार दानिश अली यांनीही सोनकर यांच्याविरोधात असभ्य शब्दांचा वापर केला होता. महुआ मोईत्रा यांनी सोनकर यांच्यावर वैयक्तिक प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. सुमारे अडीच तास चाललेल्या या चौकशीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. यात असे काही प्रश्न होते जे अत्यंत व्यक्तिगत होते असाही आरोप आता करण्यात येत आहे.
Cash For Query : होय, हिरानंदानीला लॉगइन आयडी, पासवर्ड दिला होता; मोईत्रांनी कारणही सांगितलं
काय आहे प्रकरण ?
संंसदेत सरकारला प्रश्न विचारण्याच्या मोबद्ल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप खासदार मोईत्रा यांच्यावर आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मोईत्रा यांनी लोकसभेच्या वेवसाइटवरील त्यांचा लॉगइन आयडी आणि पासवर्ड हिरानंदानी यांना शेअर केल्याचे मान्य केले होते. तसेच जर रोख स्वरुपात पैसे दिले जात असतील तर त्याची तारीख आणि संबंधित पुरावे देखील सादर करा, असे आव्हान खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले होते.