Cyclone : चक्रीवादळाचे तांडव! 140 किमी वेगाने धडकणार, शाळांना सुट्टी जाहीर; भारतीय हवामान विभागाचा इशारा

. राज्यात हवामानात बदल होताना दिसून येत असून बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे आज विदर्भात पावसाची शक्यता आहे.

Cyclone

Cyclone

cyclone : पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोठे संकट उभे राहणार आहे. हे चक्रीवादळ (cyclone) धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी करण्यात आला असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीयं. राज्यात हवामानात बदल होताना दिसून येत असून बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे आज विदर्भात पावसाची शक्यता आहे.

टोरेंटसारखा प्रकल्प नको ; पर्यावरण नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं का? सयाजी शिंदे भडकले

बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाची निर्मिती झाली. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. राज्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात धो धो पाऊस होईल. अर्णब चक्रीवादळात रूपांतर झाले. वादळी प्रणालीचे केंद्र अंदमान बेटांवरील विजयपीरमपासून 620 किलोमीटर ओडिशातील गोपाळपूर 580 किलोमीटर आणि आंध्र प्रदेशातील विखाशापट्टणम 610 किलोमीटर आग्रेयेकडे होते.

बोलताना भान ठेवा; जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून विखेंनी रामदास कदमांना सुनावले

या चक्रीवादळाची तीव्रता चांगलीच वाढताना दिसत आहे. विशाखापट्टणम किनाऱ्यावर हे वादळ धडकेल. तेलंगणा, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिसा, आंध्र प्रदेश या भागात 124 ते 140 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्राचे एक राैद्र रूप यावेळी बघायला मिळेल. या वादळीवाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. अनेक भागात घरांचे मोठे नुकसान झाले.

Exit mobile version