Mallikarjun Kharge : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव करत महायुतीने (Mahayuti) पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला. महायुतीच्या (Mahayuti) या लाटेत मविआसह कॉंग्रेसचा धुव्वा उडाला. काँग्रेसला (Congress) केवळ 16 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या परफॉर्मन्सवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू अडचणीत, 850 कोटींची कायदेशीर नोटीस, जाणून घ्या प्रकरण
काँग्रेस वर्किंग कमिटीची आज बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या पराभवावर चर्चा झाली. या बैठकीला महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या बैठकीत खर्गेंनी काँग्रेस नेत्यांची कानउघडणी करत त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर, बाबा आढाव यांचा आरोप, ईव्हीएम बाबतही शंका…
लोकसभा विजयानंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला की आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले, असा सवाल खर्गे यांनी उपस्थित केला आहे. एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे निवडणुकीत पक्षाचं नुकसान झालं आहे, असं म्हणत त्यांनी पक्षांतर्गत कलहावर नाराजी नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत आपण एकदिलाने निवडणुका लढणार नाहीत, एकमेकांवर टीका करणं थांबवणार नाही, तोपर्यंत आपण आपला पराभव रोखू शकणार नाही, असं ते म्हणाले.
खर्गे म्हणाले की, निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण असणे ही विजयाची खात्री नाही. तर वातावरणाचे निकालात रुपांतर करावे लागेल, असं काम करायला हवं होतं. अनेक राज्यांमध्ये पक्ष संघटनेनं अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही, असं म्हणत आता पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करून त्रुटी भरुन काढयला हव्यात, असा सल्लाही खर्गेंनी दिला. महाविकास आघाडीला विधानसभेत मिळालेले आकडे न्यायसंगत नाहीत, असा संशयही खर्गे यांनी व्यक्त केला.