Download App

मल्लिकार्जुन खर्गे PM फेस : पाच कारणात समजून घ्या ‘ट्रम्प कार्ड’ खेळण्याचा डाव

दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आले, त्यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांची भेट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जीं आल्या. त्यांनी केजरीवाल यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली. दोघांची ही भेट म्हणजे शिष्टाचाराची भेट असल्याचे सांगितले जात होते. मग ममता (Mamata Banerjee) आणि ठाकरे भेटल्या. बैठक सुरु झाली अन् ममतांनी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून खर्गेंचे नाव पुढे केले. बैठकीत बसलेल्या अनेकांना या गोष्टीची कल्पना होती तर अनेकांना अनभिज्ञता होती. त्यावेळी शिवसेना (UBT), आपसहित 12 प्रमुख पक्षांनी लगेचच या प्रस्तावाला पाठिंबा दिला. प्रस्ताव मंजूर होणे अद्याप बाकी आहे पण झाल्यास आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीसाठी मल्लिकार्जुन खर्गे इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा असणार आहेत.

आतापर्यंत राहुल गांधी, नीतीश कुमार अशा नावांची चर्चा असतानाच अचानक खर्गे फ्रेममध्ये आले. पण या मागे काँग्रेसपेक्षा जास्त विचार प्रादेशिक पक्षांनीच केल्याचे दिसून येत आहे. खर्रेंचे नाव सुचविण्यामागे नेमकी काय कारण आहेत, तेच आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. (Mallikarjun Kharge PM Face but What exactly are the reasons)

मल्लिकार्जुन खर्गेंचा सर्वात मोठा प्लस पॉंईंट म्हणजे, दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा चेहरा. खर्गे स्वतः कर्नाटकचे आहेत. मात्र ते कन्नडसह आठ भाषा अस्खतिल बोलतात. हिंदी, इंग्लिश, तेलगू, मराठी, तमिळ, उर्दू या भाषांमध्ये खर्गे उत्तमपणे संवाद साधतात. त्यामुळे ते फक्त दक्षिणेतील चेहरा म्हणून ओखळले जात नाहीत. प्रादेशिक भाषांमुळे ते दक्षिणेला आणि हिंदी भाषेमुळे ते उत्तर भारतालाही जोडू शकतात. शिवाय खर्गे यांना मराठी भाषा आणि महाराष्ट्राची चांगली जाण आहे. जर नीतीशकुमार पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आले असते तर दक्षिण आणि मध्य भारतात लढाई कुमकवत झाली असती, असा होरा नेत्यांनी लावला.

‘मी देखील 20 वर्षापासून असाच अपमान सहन करतोय’; धनखड यांच्या अवमानप्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया

दक्षिणेत इंडिया आघाडीतील पक्षांची मोठी ताकद आहे. यात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये स्वतः काँग्रेस, तमिळनाडूमध्ये द्रमूक आणि केरळमध्ये डाव्यांचे प्राबल्य आहे. भाजपला दक्षिणेत अद्याप ताकद जमविता आलेली नाही. याच परिस्थितीचा फायदा उचलत इंडिया आघाडी दक्षिणेवर लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे. त्यासाठी खर्गे यांच्या चेहऱ्याचा चांगला वापर होऊ शकतो. नीतीश जर दावेदार झाले असते तर तामिळनाडू, केरळ याठिकाणी त्यांच्या स्वीकारर्हातेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते. तो वाद खर्गे यांच्याभोवती होण्याची शक्यता आहे.

खर्गे यांच्यारुपाने काँग्रेसकडे देशातील सर्वात मोठ्या दलित नेत्यांपैकी एक नेता आहे. त्यामुळे काँग्रेसची प्रचलित दलित आणि मुस्लीम व्होट बँक सुरक्षित राहू शकते. शिवाय जातीनिहाय जनगणनेची भूमिका घेतल्याने ओबीसी मतदार काँग्रेसकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खर्गे यांच्या नावाचा प्राधान्याने विचार झाला असावा, असा अंदाज आहे. जर नीतीश कुमार यांना पुढे केले असते तर त्यांच्या राजकारणामुळे मुस्लिम व्होटबँक तिसऱ्या आघाडीकडे वळण्याची भीती व्यक्त केली असती.

भारताला नवा गुन्हेगारी कायदा मिळणार; गुन्हेगारी कायद्याशी संबंधित तीन विधेयकं मंजूर

खर्गेंचा अनुभव हा सर्वात मोठा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो. खर्गे गेल्या 6 दशकांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. प्रत्येक राज्यातील काँग्रेसचे संघटन कसे आहे, कोण, कुठे, काय काम करतो याची बारीक माहिती खर्गे यांना आहे. तळागाळातून संघटना माहिती असलेला आणि प्रश्नांची जाण असलेला नेत म्हणून त्यांना ओळखले जाते. याशिवाय खर्गे गेल्या 5 दशकांपासून निवडणुकांच्या राजकारणात आहेत. त्यांनी सलग 10 वेळा विक्रमी निवडणुका जिंकल्या आहेत. शिवाय त्यांनी स्वतःही लोकसभेच्या दहाहून अधिक निवडणुका जवळून पाहिल्या आहेत. शिवाय विविध राज्यांमधील बहुसंख्य विधानसभांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी आघाडीवर राहुन पक्षाचे काम केले आहे. निवडून आलेले राजकारणी, संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री असा विविध अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपला थेट टक्कर देईल या उंचीचा नेता सध्या देशात दुसरा नाही.

पाचवी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विश्वासू राजकारणी. मल्लिकार्जुन खर्गे हे अत्यंत विश्वासार्ह राजकारणी म्हणून ओळखले जातात. ते जेवढे काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहिले, तेवढेच ते गांधी कुटुंबाशीही प्रामाणिक राहिले. इंदिरा गांधी यांच्यापासून ते राहुल गांधींपर्यंत अशा तीन पिढ्यांशी खर्गे यांनी जुळवून घेतले आहे. त्याचवेळी नीतीश कुमार यांचे राजकारण भरवश्याचे नाही. त्यांनी यापूर्वी अनेकदा मनासारखे हाती न लागल्यास भूमिका बदलल्याची उदाहरणे दिसून येतात. गेल्या काही वर्षांत नीतीश यांनी दोनवेळा भाजपची साथ सोडली आणि दोनवेळा लालूंच्या सहकार्याने बिहारचे मुख्यमंत्रीपद भुषविले. त्यांना बिहारमध्ये पलटूराम अशी उपहासात्मक उपमा दिली गेली आहे. ते कधी भूमिकेवरुन पलटतील सांगता येत नाही. असा या उपमेचा अर्थ. पण याचमुळे खर्गे नीतीशकुमारांपेक्षा उजवे ठरले असावे.

follow us