नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू होताच सभागृहात गदारोळ झाला. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपने माफी मागावी अशी मागणी केली. यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले, सरकार अदानी प्रकरणाच्या तपासापासून पळ काढत आहे. आमचे ऐकले जात नाही. मात्र, आम्ही विक्रम वेताळासारखा पाठलाग सोडणार नाही.
अदानी प्रकरणावर विरोधी पक्षनेते यांनी जेपीसीची मागणी केली होती. त्यावरून सदनात गदारोळ सुरू झाला. या गदारोळामुळे दोन्ही सदनाचे काम दुपारपर्यंत थांबवण्यात आले होते. दोन वाजून गेले तरी हा गोंधळ सुरूच होता. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
या महिन्याच्या सुरुवातीला राहुल गांधी लंडनच्या दौऱ्यावर होते. तिथिल केंब्रिज विद्यापीठात बोलतांना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. भारतीयल लोकशाहीवर मोदी सरकारकडून हल्ला होत आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे. संसदेत आमचे माईक बंद केले जातात. विरोधक आवाज सभागृहात उमटू दिला जात नाही.
लोकसभा आणि राज्यसभेत राहुल यांच्या माफीची मागणी
लोकसभा आणि राज्यसभेत राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. लोकसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारताचा अपमान केला आहे. त्यांच्या विधानाचा या सभागृहातील सर्व सदस्यांनी निषेध करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांना सभागृहासमोर माफी मागण्यास सांगितले पाहिजे.
तर राज्यसभेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, राहुल गांधी यांनी देशाची प्रतिष्ठा खाली आणली आहे. त्यांनी सभागृहात येऊन माफी मागितली पाहिजे. सरकारचे आणखी एक मंत्री गिरिराज सिंह यांनी तर राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली.
खर्गे म्हणाले – राहुल गांधींचे वक्तव्य भाजप सोईनुसार मांडत आहे
तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सत्ताधाऱ्यांच्या मागणीवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खर्गे म्हणाले- भाजपचे नेते स्वत: लोकशाही चिरडत आहेत आणि प्रत्येक केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. ते हुकूमशाहीप्रमाणे देश चालवत आहेत आणि आणि वर हेच लोक लोकशाही आणि देशभक्तीबद्दल बोलतात.
आम्ही अदानी शेअर्सच्या मुद्द्यावर जेपीसी स्थापन करण्याची मागणी करत आहोत. आम्ही हा मुद्दा उपस्थित केल्यावर माईक बंद होतो आणि सभागृहात गदारोळ होतो. त्यामुळे आजही आम्ही जेपीसीची मागणी करत आहोत. सत्ताधारी पक्षाचे लोक राहुल गांधींच्या वक्तव्याचा स्वतःच्या मतानुसार अर्थ काढून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत आहेत. अदानी प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हे प्रकार सुरू असल्यचाचं खर्गे म्हणाले.
Pathan : सातव्या वीकेंडमध्येही ‘पठाण’ची छप्परफाड कमाई…
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी परदेशात आपल्या देशाविषयी काय काय बोलले, हे देखील त्यांनी वाचून दाखवलं. मोदींच्या अशा वक्तव्यांवरून देशाचा अवमान होत नाही का? असा थेट सवालही त्यांनी केला. सभागृहात बोलू देत नसल्याचा आरोप करत खर्गे म्हणाले, ‘आम्ही अदानीच्या मुद्द्यावर जेपीसी स्थापन करण्याची मागणी करत आहोत. मला 2 मिनिटेही बोलू दिले नाही. पियुष गोयल यांना बोलण्यासाठी 10 मिनिटे देण्यात आली होती. आमचा माईकही बंद करून गदारोळ होतो. मात्र, विक्रम-वेताळासारखं आता आम्ही केंद्र सरकारच्या मागे लागणार आहोत, असं ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशात लोकशाहीला स्थान नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. आणि हे आम्हाला काय बोलावं आणि काय बोलू नाही, असं सांगतात, ही लोकशाही नसून याविरोधात आम्ही आवाज उठवत आहोत, असं खर्गे म्हणाले.