Download App

इंडिया आघाडीत मिठाचा खडा, ममता बॅनर्जींनी केला काँग्रेसवर हल्लाबोल

INDIA Alliacne : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर (Assembly Election Results) तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीसोबत (INDIA Alliacne) जागावाटप योग्य प्रकारे न केल्यामुळे निवडणूक हरली. हा जनतेचा पराभव नसून केवळ काँग्रेसचा पराभव आहे. चुकीच्या कारभारामुळे काँग्रेसचा पराभव झाला. तेलंगणा व्यतिरिक्त काँग्रेसने इतर तीन राज्ये जिंकली असती परंतु इंडिया आघाडीचा पाठिंबा घेणं त्यांना महागात पडले, असा हल्लाबोल त्यांनी काँग्रेसवर केला आहे.

इंडिया आघाडीच्या मतांची विभागणी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेसने ज्या प्रकारे तेलंगणा जिंकला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान जिंकले असते. पण काही मते इंडिया आघाडीच्या पक्षांमुळे विभागले. आम्ही जागा वाटपाची फॉर्म्युला सुचवला होता. मतांच्या विभाजनामुळे त्यांचा पराभव झाला. विचारधारेबरोबरच तुम्हाला रणनीतीही हवी. जागावाटपाचा योग्य फॉर्म्युला असेल तर 2024 मध्ये भाजप सत्तेवर येणार नाही, असे त्या म्हणाल्या.

चुकांमधून शिकणार…
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पाच राज्यांच्या निवडणुकांदरम्यान झालेल्या चुकांमधून शिकू. त्या चुका सुधारतील. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी एकत्रितपणे काम करेल आणि चुका सुधारेल.

मध्य प्रदेशात हायकमांड अ‍ॅक्शन मोडवर, कमलनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी

पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर हे वक्तव्य
राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. इथे तेलंगणामध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे, तर राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यात काँग्रेसची सत्ता गेली आहे. येथे भाजपने बाजी मारली आहे. तर मध्य प्रदेशात भाजपला सत्तेपासून दूर करण्यात काँग्रेसला अपयश आले.

मिझोराममध्येही नव्या पक्षाचा विजय झाला आहे. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव होता. काँग्रेसने एकत्र निवडणूक लढविण्याऐवजी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. तर अनेक मित्रपक्षांनीही निवडणूक लढवली होती. राजकीय विश्लेषकांच्या मते, इंडिया आघाडीने निवडणुकीच्या मैदानात प्रवेश केल्यामुळे अनेक जागांवर मतांची विभागणी झाली आणि त्याचा थेट फायदा भाजपला झाला.

‘राज्यात रेकार्डिंग व्हायरल करणार’; मनोज जरांगेंनी महाजनांना भरला दम

मित्रपक्षांनी काँग्रेसवर टीका केली
जनता दल-युनायटेडचे ​​केसी त्यागी म्हणाले की, काँग्रेसने इंडिया आघाडीतील इतर पक्षांकडे दुर्लक्ष केले परंतु स्वबळावर विजय मिळवता आला नाही. केरळचे मुख्यमंत्री आणि सीपीएम नेते पिनाराई विजयन म्हणाले की, हिंदी पट्ट्यातील भाजपचा मुकाबला करताना एकत्र लढणे आवश्यक आहे.

Tags

follow us