Download App

INDIA Alliance : ‘ममतांशिवाय ‘इंडिया’ आघाडी शक्य नाही’; स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेस बॅकफूटवर!

INDIA Alliance : केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात तयार करण्यात आलेल्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) ऐन निवडणुकीच्या आघाडीवर जबरदस्त झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर (Lok Sabha Election) लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. जागावाटपाच्या चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा करून इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आघाडीतील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे.

INDIA Alliancne : भाजप विजयाचे ‘इंडिया’ला धक्के! उद्याच्या बैठकीकडे नितीशकुमारांची पाठ

ममता बॅनर्जींना वगळून इंडिया आघाडीची कल्पना करता येणार नाही. ममता बॅनर्जी या आघाडीचा महत्वाचा भाग आहेत. लांबच्या प्रवासाला निघाल्यानंतर काही गतिरोधक येतातच. मात्र यामध्ये आता काहीतरी मार्ग काढला जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले. ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर रमेश यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आम्ही जागावाटपाचा जो प्रस्ताव दिला होता तो काँग्रेसने नाकारला. त्यानंतर काँग्रेसने आमच्याबरोबर कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे आता आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे असे बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने राज्यातील एकूण जागांपैकी फक्त दोन जागा काँग्रेसला देणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसा प्रस्तावही काँग्रेसला देण्यात आला होता. काँग्रेसबरोबर जागावाटपाच्या मुद्द्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. पक्षाने काँग्रेसला दोन जागा देऊ केल्या होत्या. मात्र काँग्रेसने 10 ते 12 जागांची मागणी केली होती अशी माहिती तृणमूल काँग्रेसमधील एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

Video : ममता बॅनर्जी नव्हे ती तर मुमताज खान; भगवा रंग बघितला की भडकते

follow us

वेब स्टोरीज