Mamata Banerjee : जीव देईल पण देशाची फाळणी होऊ देणार नाही!

Mamata Banerjee : जीव देईल पण देशाची फाळणी होऊ देणार नाही!

Mamata Banerjee On BJP : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ईदच्या (Eid) निमित्ताने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, आम्हाला देशात फाळणी नको (No division in the country)आहे. ईदच्या दिवशी तुम्हाला वचन देते की मी जीव देईल पण देशाची फाळणी होऊ देणार नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकाता (Kolkata) येथील रेड रोडवर ईदच्या नमाजनंतर एका सभेला संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी जनतेला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) संघटित होऊन भाजपचा पराभव करण्याचे आवाहन केले.

तरुणांना संधी देणे शरद पवार यांच्याकडून शिकलो; अजित पवार म्हणतात…

ममता बॅनर्जी म्हणाल्या, की आम्हाला बंगालमध्ये शांतता हवी आहे. आम्हाला दंगली नकोत, देशात फाळणी नको, शांतता हवी आहे. काही लोक देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि द्वेषाचे राजकारण करत आहेत. मी जीव द्यायला तयार आहे पण देशाची फाळणी होऊ देणार नाही.

भाजपला दंगलखोर पक्ष म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की शांत राहा, कोणाचेही ऐकू नका. मला दंगल पार्टीशी लढावे लागेल. एजन्सीशीही लढावे लागेल. मी माझ्या हिंमतीच्या जोरावर त्यांच्याशी लढत आहे. मी त्यांच्यापुढे झुकणार नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता म्हणाल्या की, कोणीतरी भाजपकडून पैसे घेतो आणि म्हणतो की आम्ही मुस्लिम मतांचे वाटप करू. मी त्यांना सांगते की, त्यांच्यात भाजपसाठी मुस्लिम मतांचे विभाजन करण्याची हिंमत नाही. बघूया, कोण जिंकतो आणि कोण नाही ते. त्या म्हणाल्या की, लोकशाही गेली तर सर्व काही निघून जाईल. आज संविधान बदलले जात आहे. इतिहास बदलला जात आहे. त्यांनी एनआरसी आणले. मी त्याला हे करू देणार नाही असे म्हणत एकप्रकारे ममता बॅनर्जींनी भाजपला इशाराच दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube