Udayanidhi Stalin On Ram Mandir : काही दिवसांपूर्वी हिंदू सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे तमिळनाडूनचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांची आता पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. त्यांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिरावरून (Ram Mandir)वादग्रस्त वक्तव्य केलं. आमच्या पक्षाचा कोणत्याही धर्माला विरोध नाही, पण मशिद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही, असं स्टॅलिन म्हणाले.
कॅन्सरविरोधातील लढाईसाठी तानाजी सावंतांचा ‘मास्टर प्लॅन’ : राज्यात मिळणार ‘खास’ सुविधा
अयोध्येत नव्यानं उभारण्यात आलेल्या मंदिरात 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्या आणि देशात आनंदाचं वातावरण आहे. मात्र, आज माध्यमांशी संवाद साधताना उदयनिधी स्टॅलिन यांना अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराबाबत विचारले. त्यावर बोलतांना उदयनिधी म्हणाले की, द्रमुकचा कोणत्याही आस्थेला किंवा धर्माला विरोध नाही. मंदिर बांधण्यात काहीच अडचण नाही. पण, मशिद पाडून मंदिर बांधणे आम्हाला मान्य नाही. अध्यात्मवाद आणि राजकारण यांची सांगड घालू नका, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी PM मोदींनी प्रसिद्ध केले राम मंदिरावरील टपाल तिकीटे, जाणून घ्या खासियत
22 जानेवारीला रामललाच्या मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणही पाठवण्यात आले होते, मात्र बहुतांश नेत्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे. शरद पवार, प्रकाश आंबेडकर, सोनिया गांधी, मल्लिाकार्जून खर्गे हे नेते या कार्यक्रमात, सहभागी होणार नाहीत.
उदयनिधींनी केली होती डेंग्यू आणि मलेरियाशी केली
काही दिवसांपूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन आणि हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधाने केलं होतं. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. सनातनला केवळ विरोध करून चालणार नाही तर तो संपवला पाहिजे, असे ते म्हणाले. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्यामुळं त्यांचं पूर्णपणे करायला हवं, असे तं म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने देशभरात वातावरणं पेटलं होतं.
उदयनिधी स्टॅलिन हे करुणानिधी यांचे नातू
उदयनिधी स्टॅलिन यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे. ते तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड नेते दिवंगत एम करुणानिधी यांचे नातू आहेत. उदयनिधी यांचे वडील एमके स्टॅलिन द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांना गेल्या वर्षीच स्टॅलिन सरकारमध्ये क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री करण्यात आले होते. याशिवाय ते द्रमुकच्या युवा शाखेचे राज्य सचिवही आहेत.