Manipur Violence : मणिपूर राज्य अजूनही धुमसत आहे. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला असून, यात दोघांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर चार जणांना गोळ्या लागल्या आहेत. तेंगनौपाल व काकचिंग जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी या दोन घटनांमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला झाला आहे. स्थानिक नागरिक व आसाम रायफल्सच्या जवानामध्ये धुमश्चक्री झाली. त्यानंतर जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करण्यात आला आहे.
Maratha Reservation : मनोज जरांगे मागतात ते आरक्षण टिकेल का? संभाजीराजेंचा सवाल
जखमी व्यक्तींना एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे दोघा जणांना मृतघोषित करण्यात आले आहे. तर गोळी लागलेल्या व्यक्तींना इम्फालमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराची घटनेची माहिती मिळाल्यानंतर नौबल आणि काकचिन जिल्ह्यातील लोकही मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. त्यांना आसम रायफल्सच्या जवानांनी रोखले. त्यात झालेल्या धुमश्चक्रीत 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आसाम रायफल्सच्या जवानांकडून अश्रू गॅसचा वापर करण्यात आला. त्यात 50 हून अधिक महिला जखमी झाल्या आहेत. तर काही आसाम रायफल्सचे काही जवानही यात जखमी झाले. तर दुसरीकडे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जात असलेल्या आरएएफच्या तुकडीला लोकांना रोखले होते. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
मल्लिकार्जुन खर्गेंना G20 डिनरचे निमंत्रणच नाही, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
मैतेई समाजातील लोकांनी लष्कराचा गणवेश परिधान करून हा हल्ला केला असल्याचा दावा कुकी समाजाकडून करण्यात येत आहे. हा हल्ला झाल्यानंतर बचावासाठी काही जण लष्कराच्या कॅम्पकडे पळाले होते. त्यात गोळीबार होऊन आसाम रायफलचा जवान आणि कुकी समाजातील एक व्यक्ती असे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी
मणिपूरमधील काही जिल्ह्यांची परिस्थिती पुन्हा बिघडत आहे. बुधवारी हजारो आंदोलक बिष्णुपूर जिल्ह्यातील फुगकचाओ इखाई येथे एकत्र आले होते. हे सर्वजण टोरबुंगमधील त्यांच्या घरांमध्ये जाण्यासाठी लष्कराचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मणिपूरच्या पाचही घाटी जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.