राजधानीत मराठीचा आवाज घुमणार, 70 वर्षांनी दिल्लीत होणार मराठी साहित्य संमेलन

Sahitya Sammelan 2024 : गेल्या काही दिवसांपासून 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan 2024) कोणत्या शहरात होणार

Sahitya Sammelan 2024 : राजधानीत मराठीचा आवाज घुमणार, 70 वर्षांनी दिल्लीत होणार मराठी साहित्य संमेलन

Sahitya Sammelan 2024 : राजधानीत मराठीचा आवाज घुमणार, 70 वर्षांनी दिल्लीत होणार मराठी साहित्य संमेलन

Sahitya Sammelan 2024 : गेल्या काही दिवसांपासून 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan 2024) कोणत्या शहरात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. याबाबत सोशल मीडियावर (Social Media) देखील अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार 98 वे साहित्य संमेलनाचे ठिकाण ठरले आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे यावेळी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 70 वर्षानंतर राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) मराठी भाषेचा आवाज घुमणार आहे. माहितीनुसार, 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 8 ठिकाणाहून निमंत्रण प्राप्ती झाली होती. त्यानंतर साहित्य संमेलनाच्या ठिकाणाची निवड करणाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली.

फेब्रुवारी महिन्यात 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे झाल्याने धुळ्याचा पर्याय बाद करण्यात आला होता. तर औंध आणि औंदुबर लहान असल्याने ही दोन्ही ठिकाणे देखील बाद करण्यात आले होते. त्यामुळे दिल्ली, मुंबई आणि इंचलकरंजी हे 3 ठिकाण बाकी होते. या ठिकाणाबाबत आज मुंबईत साहित्य संमेलनाच्या कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली.

मोठी बातमी! भारतीय संघ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत दाखल, पेनल्टी शूटआऊटमध्ये निर्णय

या बैठकीत निवड समितीने आगामी साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी देशाची राजधानी दिल्लीमध्ये 1954 साली लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते. दिल्लीत होणाऱ्या या साहित्य संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला जाणार का? याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version