Download App

‘Operation Sindoor’मध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा खात्मा

भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हल्ल्यात त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

Masood Azhar 14 Family Member Killed In Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताना अखेर रात्री पाकिस्तानला धडा शिकवला आहे. यामध्ये भारताकडून पाकिस्तानमधील तब्बल ९ दहशतवादी स्थळं उद्वस्थ करण्यात आली आहेत. (Sindoor)  दरम्यान, यामध्ये सर्जिकल स्ट्राईकमध्ये मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Video : भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर का केला?, संयुक्त पत्रकार परिषदेत दिली A टू Z माहिती

पाकिस्तानी माध्यमां प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतीय हवाई दलाने बुधवारी पहाटे जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी मौलाना मसूद अझहरच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात कुटुंबातील १४ दहशतवादी मारले गेले आहेत. भारतीय सीमेपासून १०० किमी अंतरावर असलेल्या बहबलपूरमधील मसूद अझहरच्या घरावर पहाटे १.३० वाजता भारतीय सैन्याने हा हल्ला केला. हा हल्ला झाला त्यावेळी मसूद अझहर घरी उपस्थित नव्हता.

मसूद अझहर कोण आहे?

मसूद अझहरचा जन्म १० जुलै १९६८ रोजी पाकिस्तानातील पंजाबमधील बहावलपूर येथे झाला. तो ११ भावंडांमध्ये तिसरा आहे. त्यांचे वडील अल्लाह बख्श शब्बीर हे शाळेचे मुख्याध्यापक आणि दारुल उलूम दिवानियाचे मौलवी होते. मसूदने कराचीतील जामिया उलूम-उल-इस्लामिया मदरशात शिक्षण घेतले, जिथे त्याने कट्टरपंथी विचारांचा स्वीकार केला. तो प्रथम हरकत-उल-मुजाहिदीन (HuM) मध्ये सामील झाला, ज्याने अफगाणिस्तानात सोव्हिएत सैन्याविरुद्ध जिहाद लढला. आता ही संघटना कट्टरपंथी देवबंदी विचारसरणीचे पालन करते आणि भारतापासून काश्मीर हिसकावून पाकिस्तानात विलीन करण्याचे स्वप्न पाहते.

पाकिस्तान पंतप्रधानांची बेठक

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हल्ल्याची पुष्टी केली आहे. भारताने आमच्यावर युद्ध करण्यास भाग पाडलं आहे. आम्हाला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे असं ते या बैठकीत म्हणाले आहेत.

follow us