MDR Transactions : 15 ऑक्टोबर 2026 पासून, 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट ‘पर्सन-टू-मर्चंट’ (P2M) व्यवहारांवर ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (MDR) लागू करणार आहे. ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने (NPCI) जाहीर केलेल्या नवीन आराखड्यानुसार, पात्र व्यवहारांवर व्यापाऱ्यांना 0.4 % दराने MDR भरावा लागेल. याबाबत जाणून घ्या सर्वकाही.
ग्राहकांकडून एमडीआर आकारला जाणार?
– MDR हे व्यापाऱ्याकडून पेमेंट इकोसिस्टमला दिले जाणारे शुल्क आहे.
– UPI पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना हे शुल्क थेट भरावे लागणार नाही.
2000 रुपयांपेक्षा कमी व्यवहारावर किती MDR?
-2 हजारपर्यंतच्या व्यापारी UPI व्यवहारांवर शून्य MDR आकारला जाईल.
व्यापारी किती एमडीआर देणार?
– 3,000 रुपयांच्या पेमेंटवर 12 रुपये
-10,000 रुपयांवर 40 रुपये
– 50,000 रुपयांवर 200 रुपये आकारले जातील.
व्यवहाराच्या मूल्याबरोबर MDR वाढणार?
-एमडीआर प्रति व्यवहार 300 रुपयांपर्यंत मर्यादित 75,000 रुपयांवर 0.40% म्हणजे 300 रुपये होतात आणि या रकमेच्या पुढे शुल्क वाढत नाही.
मोठ्या UPI पेमेंटवर किती MDR लागू होतो?
-1 लाख रुपयांच्या व्यवहाराला किंवा अगदी 5 लाख रुपयांच्या व्यवहारालाही 300 रुपयांची मर्यादा लागू असणार आहे.
पर्सन टू पर्सन UPI हस्तांतरणावर MDR लागू होईल का?
पर्सन टू पर्सनमधील हस्तांतरण, जसे की पालकांनी मुलांना पैसे पाठवणे किंवा मित्रांनी एकमेकांना पैसे पाठवणे, हे व्यापारी एमडीआर शुल्काच्या बाहेर राहतात.
UPI MDR चा फॉर्म्युला समजून घ्या
-2,000 पर्यंत → 0% MDR
-2,000 पेक्षा जास्त → 0.40% MDR
-कमाल शुल्क → 300 प्रति व्यवहार
-MDR भरणार → व्यापारी
-ग्राहकांवर थेट MDR → नाही
पवित्र मक्कावर हल्ला? सौदी अन् हुथी बंडखोरमध्ये संघर्ष पेटला; अलर्ट जारी
