Microsoft Windows : जगभरातील संगणक (Microsoft ) आणि लॅपटॉप सध्या ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडले आहेत. प्रसिद्ध सायबर सुरक्षा कंपनी CrowdStrike ने एक अपडेट सांगितली, ज्यानंतर MS Windows वर चालणारे सर्व संगणक आणि लॅपटॉप अचानक क्रॅश होत आहेत.
काम करत असताना लॅपटॉप अचानक बंद होत आहेत आणि त्यानंतर यूजर्सना निळा स्क्रीन दिसत आहे. त्या स्क्रीनवर सांगितलं जातय की, तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणं आवश्यक आहे. या प्रक्रियेलाच ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) म्हटलं जात.
क्राउडस्ट्राइककडून निवेदन जारी
या समस्येमुळे जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणारे लॅपटॉप आणि संगणक बंद झाले आहेत. CrowdStrike ने या प्रकरणाची दखल घेत समस्येची चौकशी सुरू केली आहे. CrowdStrike च्या प्रतिनिधीने एक विधान जारी केले आहे की, विंडोज चालवणाऱ्या मशीनवर BSOD समस्या उद्भवणाऱ्या एका व्यापक समस्या निर्माण झाली.
या गोष्टींचीकाळजी घ्या या प्रकरणात त्या हलक्यात सुटणार नाहीत; पूजा खेडकर प्ररणावर विजय कुंभारांची सडेतोड मुलाखत
जर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) ची समस्या येत असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. एकतर अशावेळी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःहून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक सूचना जारी होण्याची प्रतीक्षा करा. CrowdStrike सध्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम सुरू आहे आणि लवकरच तुम्हाला त्याबद्दल अपडेट मिळेणार आहे.
इडिगोकडून निवेदन जारी
Microsoft सध्या काही समस्या सुरू आहेत. त्यामुळे ऑनलाईल कामावर ताण आला आहे. काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या काळात एकाधिक बुकिंगचे प्रयत्न करणं टाळा. ही समस्या सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आपण काही काळ वाट पाहावी ही विनंती. अशा शब्दांत इंडिगो विमान सेवेने ट्वीट केलं आहे.
मायक्रोसॉफ्टने काय सांगितले?
मायक्रोसॉफ्टने एक्सवर सविस्तर पोस्ट करून ही समस्या का उद्भवली आणि त्यावर काय उपाययोजना केल्या जात आहेत. याची माहिती दिली. त्यांनी सांगितले, मायक्रोसॉफ्टच्या ३६५ ॲप्स आणि सेवा वापरताना युजर्सना अडचणी येत आहेत. आम्ही या समस्येचा तपास करत आहोत. ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही पर्यायी यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करत आहोत. पर्यायी यंत्रणा उभारताना त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. या समस्येवर उपाय शोधत असून युजर्सच्या अडचणी हळुहळु कमी होतील.
We're now also hearing of a 911 outage in Ohio. This is possibly related to an issue at global cybersecurity firm Crowdstrike https://t.co/yUKHE6o1Rc
— BNO News Live (@BNODesk) July 19, 2024