Download App

‘रक्ताचे पाट सोडा दगडफेकही नाही’; ‘काश्मीरात रक्ताचे पाट वाहतील’ म्हणणाऱ्या गांधींना टोला

Image Credit: Letsupp

Amit Shah On Congress : आगामी लोकसभा निवडणूका (Loksabha Election) काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्याआधीच राज्यासह देशातील राजकारण चांगलच तापू लागलं आहे. भाजपचे नेते अमित शाह (Amit Shah) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यातील बैठकीनंतर अमित शाह यांची जळगावात जाहीर सभा सुरु आहे. या सभेतून अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 च्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टोलेबाजी केलीयं. जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर रक्ताचे पाट तर सोडाच दगडफेकही झाली नसल्याचा टोला अमित शाह यांनी लगावला आहे.

Praful Patel : शपथविधीनंतर पवारांना भेटून माफी मागितली पण… पटेलांनी सांगितला ‘तो’ किस्सा

भारताच्या स्वातंत्र्यापासून जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 चा प्रश्न ऐरणीवर होता. हा प्रश्न कधीही सुटणार नसल्याची परिस्थिती होती. यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली भूमिका संसदेत मांडली होती. जर जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवलं तर रक्ताचे पाट वाहणार असल्याचं राहुल गांधींनी संसदेत सांगितल्याचं अमित शाह म्हणाले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवलं आहे, त्यावेळी रक्ताचे पाट तर सोडाच पण दगडफेकही झाली नसल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

तीन पक्ष फिरुन येणारांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत; अजित पवारांचा रडारवर पुन्हा अमोल कोल्हे

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला सुरक्षित करण्याच काम केलं आहे. देशाला आतंकवाद आणि नक्षलवादापासून मुक्त केलं, देशाला समृद्ध केलं असल्याचंही अमित शाह म्हणाले आहेत.

इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान, आदित्य एल-1 लाँचच्या दिवशीच मिळाली माहिती

अर्थव्यवस्थेवरुन काँग्रेसला घेरलं :
तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान झाले होते तेव्हा काँग्रेसकडून एक अर्थशास्त्र पंतप्रधान बनल्याचं सांगण्यात येत होतं. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाची अर्थव्यवस्था 11 व्या नंबरवर आणली होती. त्यानंतर काँग्रेसच्या काळात ही अर्थव्यवस्था 11 व्याचं नंबरवर होती. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर अर्थव्यवस्था 11 व्या नंबरवरुन 5 व्या नंबरवर आली असल्याची टीका अमित शाह यांनी काँग्रेसवर केली आहे.

follow us

वेब स्टोरीज