इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान, आदित्य एल-1 लाँचच्या दिवशीच मिळाली माहिती
S Somnath : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख एस सोमनाथ (S Somnath) यांना कॅन्सरचे निदान झाले आहे. भारताच्या सन मिशन आदित्य एल-1 च्या (Aditya L-1) प्रक्षेपणाच्या वेळी त्यांना कर्करोग झाल्याची माहिती मिळाली होती. अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान त्यांनी या आजाराचा खुलासा केला आहे.
सोमनाथ यांनी एका मुलाखतीत सांगितले की चांद्रयान-3 मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या वेळीच आरोग्याशी संबधित समस्या जाणवत होत्या. मात्र, तोपर्यंत काहीही स्पष्ट झाले नव्हते. आदित्य मिशन-1 लाँचच्या दिवशीच आपल्याला कॅन्सर आजाराचे निदान झाले. हा माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी मोठा आघात होता. या आजाराची माहिती झाल्यानंतर सर्व सहकारी शास्त्रज्ञही दु:खी झाले होते. मात्र या आव्हानात्मक काळात स्वत:वर संयम ठेवला, कुटुंब आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले, असे त्यांनी म्हटले.
लोकसभेसाठी BJP चं कौटुंबिक कार्ड; मी चौकीदार नंतर, मी मोदींचं कुटुंब’; नेत्यांनी बदललं ‘X’ बायो
आदित्य मिशन-1 प्रक्षेपणानंतर पोटाचे स्कॅन करण्यात आले होते. त्यावेळी कॅन्सरचा खुलासा झाला होता. मात्र अधिक तपास आणि उपचारासाठी ते चेन्नईला गेले. त्यांना हा आजार अनुवांशिकरित्या झाल्याचे उघड झाले आहे. त्यांना पोटाचा कर्करोग झाला आहे.
मोदी-शहा यांचा प्लॅन : नितीन गडकरी यांचा लोकसभेसाठीचा पत्ता कट होणार?
काही दिवसांतच कॅन्सरचे निदान झाले होते. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची केमोथेरपी करण्यात आली. त्यावेळी संपूर्ण कुटुंब मोठ्या कठिण काळातून जात होते, असे सोमनाथ यांनी सांगितले. पण आता यातून सावरलो आहोत. उपचार झाले आहेत आणि यातून ते बरे झाले आहेत. सध्या औषधोपचार सुरू आहेत. पण या काळात त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्याला खूप साथ दिली.