Mocha Cyclone : मोखा चक्रीवादळाने धारण केलं रौद्ररूप, किनारी भागाला सतर्कतेचा इशारा

Mocha Cyclone alert for costal area : गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासाह मुसळधार झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीच मोठ नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळाचं नाव […]

Cyclon2

Cyclon2

Mocha Cyclone alert for costal area : गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासाह मुसळधार झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीच मोठ नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने चिंता वाढली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळाचं नाव ‘मोखा’ असं आहे. दरम्यान ते 11 ते 15 मे दरम्यान बांग्लादेश किनारपट्टीला धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारं हे चक्रीवादळ मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ असणार आहे. यूएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टमनने या चक्रीवादळाबद्दलचा अंदाज व्यक्त केला होता.

Cyclone Mocha : बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ, 11 ते 15 मे दरम्यान बांग्लादेश किनारपट्टीला धडकणार

बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारीच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ओडीशा सरकारडून निर्देश देण्यात आले आहेत. तर आता या वादळाने रौद्ररूप धारण केलं आहे. हे वादळ ताशी 9 किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकताना दिसत आहे.

शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीला गालबोट; मिरवणूकीत दगडफेकीची घटना

14 मे ला या वादळाने बांगलादेश आणि म्यानमारच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकलं होतं. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान पूर्वा मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांच्या किनारी भागाला अलर्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version