शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीला गालबोट; मिरवणूकीत दगडफेकीची घटना

शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीला गालबोट; मिरवणूकीत दगडफेकीची घटना

Stone pelting during Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti procession in Shevgaon : काल छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती (Birth anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj) सर्वत्र उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त अनेक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, अहमनगरमधील शेवगावमध्ये (Shevgaon) छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीला (procession) गालबोट लागले आहे. शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज जंयतीच्या मिरवणूकीत दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यावेळी चिघळलेली परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पोलिसांना (police) लाठीचार्ज करावा लागला. जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले. सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. तर पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

शेवगावमध्ये दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ सुरू होती, या दंगलीत शेवगाव पोलीस ठाण्याचे चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पाथर्डी, नेवासा येथून अतिरिक्त पोलिस तैनात होईपर्यंत शेवगाव पोलिसांनी दंगल आटोक्यात आणण्याचे पुरेपुर प्रयत्न केले. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अहमदनगरहून शेवगावला मोठा पोलीस फौजफाटा पाठवण्यात आला आहे. अहमगनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि स्पेशन इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस डॉ. बी. जी. शेखर हे शेवगावमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या दगडफेकीप्रकरमी पोलिसांनी 102 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे

आयएससी बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षेत ठाण्याची इप्शिता देशात पहिली

सायंकाळी 5.30 च्या सुमारास शहरात मिरवणुकीला सुरुवात झाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. रात्री 8 वाजताच्या दरम्यान, ही रॅली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. मिरवणुकीच्या दिशेने अचानक दगडफेक झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अफवांना पीक येऊन दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सर्वत्र पळापळ झाली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने पटापट बंद केली. जमावाने वाहनांवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube