Cyclone Mocha : बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ, 11 ते 15 मे दरम्यान बांग्लादेश किनारपट्टीला धडकणार
Cyclone Mocha in Bay Of Bengal : गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासाह मुसळधार झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीच मोठ नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने चिंतीा वाढली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळाचं नाव ‘मोचा’ असं आहे. दरम्यान ते 11 ते 15 मे दरम्यान बांग्लादेश किनारपट्टीला धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाने सांगितले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारं हे चक्रीवादळ मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ असणार आहे. यूएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टमनने शनिवारी या रात्री या चक्रीवादळाबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे.
‘पुन्हा वज्रमुठ सभा होणार नाही’, भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्युत्तर
दरम्यान बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ हे चक्रीवादळ 5 ते 11 मे दरम्यान निर्माण होऊ शकत. त्याचबरोबर 5 मेच्या दरम्यान दक्षिण बंगालच्या उपसागरात दबाव निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान हवामान विभाग बंगालच्या उपसागरात होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेऊन असणार आहे. या वादळाचा वेग ताशी 150 ते 180 कीमी असणार आहे. ते भारतात ओडिसा किनारपट्टीला धडकू शक