‘पुन्हा वज्रमुठ सभा होणार नाही’, भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्युत्तर

‘पुन्हा वज्रमुठ सभा होणार नाही’, भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्युत्तर

BJP on Vajramooth rally : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी (BKC) मैदानावर झाली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. बारसू प्रकरण, बुलेट ट्रेन, अमित शहांचा दौरा, नारायण राणे, उदय सामंत आणि शरद पवारांची भेट या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी वज्रमूठ सभेतून हल्लाबोल केला. त्यांच्या या टीकेला भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ही महाविकास आघाडीची शेवटची सभा असल्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार… पुन्हा एकदा मुंबईकरांची सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न.. काहीतरी नवीन बोला.. आणि कोण तोडणार??.. कोण बोललं?? उगाचच टाईम पास.. आणि समजा दुर्दैवानं असा प्रयत्न कुणी केला तर त्याला शिंदे -फडणवीसांनी धडा शिकवलाच समजा..

Uddhav Thackeray ; बारसू म्हणजे पाकव्याप्त काश्मिर नाहीय, मी 6 तारखेला जाणार

भाजप नेत्या चित्रा वाघ यांची टीका
उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई तोडण्याची जुनी कॅसेट वाजवायला सुरू केलीय. पण जनता सुज्ञ आहे. तुमच्या या भूलथापांना जनता भीक घालणार नाही. आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही मुंबईची काळजी करू नका. मुंबई सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सक्षम आहेत. तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
“मी स्वतः उद्धव ठाकरेंची लाईव्ह सभा ऐकली त्यांच्या भाषणात मला कुठेही बेस दिसला नाही. कधी बारसू, कधी पालघर, कधी चीन, कधी सत्यपाल, कधी चीन नक्की ते कशावर बोलले कळलं नाही. त्यामुळं माझ्या दृष्टीनं हा फ्लॉप शो होता. पण यानंतर कदाचित पुन्हा वज्रमुठ सभा होणार नाही, हे मविआच्या नेत्यांनी मनोमन तारलं असावं. कदाचित ही आपली शेवटची भेट असेल, असंही नेत्यांना वाटलं असेल कारण सभा सुरु असताना अजित पवार, अशोक चव्हाण हे आपसांत गप्पा मारत होते. झालं बाबा एकादचं आमचं भाषण! अशा अविर्भावात ते बसले होते. त्यामुळं या सभेतून एवढा काही विशेष अर्थ काढण्याची गरज नाही”

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube