Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. त्यांची सुरक्षा झेड प्लसवरून (Z Plus) ॲडव्हान्स सिक्युरिटी लाइजन (Advance Security Liaison) करण्यात आली. सध्या ही सुरक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आहे. आयबीने गृहमंत्रालयाला दिलेल्या रिपोर्टनंतर केंद्राने भागवत यांना एएसएल सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अॅडव्हान्स सिक्युरिटी लाइजन (ASL) ही सुरक्षा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (NSG) च्या सुरक्षेपेक्षा किती वेगळी आहे? याच विषयी जाणून घेऊ.
12 औद्योगिक स्मार्ट शहरे अन् 10 लाख युवकांना रोजगार; केंद्र सरकारने मंत्रिमंडळात घेतले मोठे निर्णय
ASL सुरक्षा म्हणजे काय?
ASL सुरक्षेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, सेन्सर्ससह सुरक्षा उपकरणे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येतो. यामध्ये असे सैनिक आणि अधिकारी तैनात केले जातात जे अनेक प्रकारच्या धोक्यांना तोंड देण्यास सक्षम असतात. ASL सुरक्षेमध्ये मल्टी लेयर सुरक्षा यंत्रणा पुरवली जाते.
ASL सुरक्षेनंतर मोहन भागवत जेथे जातील, तेथे येण्यापूर्वी त्या ठिकाणाची पाहणी केली जाईल. सुरक्षा रीहर्सल होईल. त्या ठिकाणावरील धोके समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आरोग्य विभागासह स्थानिक पातळीवरील काम करणाऱ्या अनेक यंत्रणा तेथे उपस्थित राहतील. एएसएल सुरक्षेनंतर मोहन भागवत ज्या ठिकाणी पोहोचतील त्या ठिकाणी सीआयएसएफची टीम आधीच उपस्थित असेल. त्यांच्या ग्रीन सिग्नलनंतरच मोहन भागवत त्या ठिकाणी जातील. खास तयार केलेल्या हेलिकॉप्टरमधून ते प्रवास करतील.
Ground Zero : कुल-थोरात जोडीचं राजकारणच संपणार? दौंडमध्ये तिसऱ्या भिडूचा उदय
दरम्यान, कोणत्याही प्रकारचा धोका असल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी वेगवेगळ्या सुरक्षा दलांशी चर्चा केली जाईल.
SPG संरक्षण कोणाला मिळते?
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ही देशातील उच्चस्तराची सुरक्षा फोर्स आहे. ही सुरक्षा केवळ मर्यादित व्हीव्हीआयपींनाच पुरवली जाते. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल सिक्युरिटी ग्रुप म्हणजेच एसपीजीकडे असते. भारतीय पोलीस सेवेतील डीजी रँकचे अधिकारी याचे प्रमुख आहेत. 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी विशेष एजन्सीकडे असावी असा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर 1988 मध्ये संसदेत एसपीजी कायदा आणण्यात आला आणि ही सुरक्षा यापूर्वी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आली होती, मात्र मोदी सरकारने यात बदल करून ही सुरक्षा केवळ पंतप्रधानांनाच मिळेल, अशी तरतूद केली.
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सुरक्षा चार स्तराची असते. या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत एसपीजी जवान हे पंतप्रधानांच्या सर्वात जवळ असतात. ते अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असतात.
NSG सुरक्षा कोणाला पुरवतात?
1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान भारतीय सैन्याचे नुकसान झाले तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG सुरू करण्यात आले. यानंतर दहशतवादी हल्ल्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष कमांडो युनिट तयार करण्यात आले.
NSG मध्ये कर्मचारी आणि अधिकारी असे दोन गट आहेत. प्रथम, स्पेशल ॲक्शन ग्रुप (एसएजी) आणि दुसरा स्पेशल रेंजर ग्रुप (एसआरजी). SAG चे काम दहशतवादी कारवायांना रोखणे आहे. तर SRG चा वापर VIP सुरक्षेसाठी केला जातो.