राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त बंगळुरू येथे भागवत (RSS) यांच्या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे दुसरं पुष्पसत्र गुंफण्यात आलं आहे. त्यांनी यावेळी हिंदू राष्ट्राच्या जीवन ध्येय आणि संघाची पुढील वाटचाल यावर मोठं भाष्य केलं आहे. सध्या हिंदू राष्ट्राची मोठी चर्चा सुरू आहे. अशातच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे.
स्वामी विवेकानंद यांनी प्रत्येक राष्ट्राच्या पुर्ततेचे ध्येय असते. भारताचे जगाला धर्म देणे हे ध्येय आहे. धर्माची तुलना अनेकदा चुकीच्या पद्धतीने करण्यात येते. धर्मापासून निर्माण झालेला धर्म म्हणजे बांधणे; तो देवापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने करावयाच्या आणि करू नये अशा गोष्टींचा संच असल्याची फोड डॉ. भागवत यांनी केली. जीवनाचे मूळ स्वरुप, कर्तव्य, संतुलन, शिस्त आणि अतुट तत्व अशी धर्माची व्याप्ती खूप मोठी असल्याचे सरसंघचालक म्हणाले.
आग निर्माण करणे हा अग्नीचा धर्म आहे. त्याचप्रमाणे धर्म सृष्टीला टिकवून ठेवतो. तो अतिरेक टाळतो. मानवजातीला या भौतिक सुखातूनही खकरा आनंद, समाधान, संतोष मिळाला नसल्याचे मत त्यांनी मांडले. प्रत्येक जण आनंदाच्या शोधत आहे. सध्या जीवन सोपं झालेलं आहे. पण समाधानाचा अभाव आहे. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती केली. परंतु संघर्ष आणि अशांतता सुरूच आहे. आपल्याला शरीर, मन आणि बुद्धीचे ज्ञान मिळाले आहे. पण या तिघांचा मिलाफ करणारे रसायन सापडलेले नाही. तो दुवा आपल्याला माहिती नाही असे निरीक्षण भागवतांनी नोंदवले.
…तेव्हाच भारत विश्व गुरू बनेल; सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठ विधान
व्यक्तिकेंद्री समाज, समाजातील दरी आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे मानवावर ही वेळ आल्याचे मंथन त्यांनी यावेळी केले. जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा वैयक्तिक स्वातंत्र्य दडपले जाते. तर जेव्हा तंत्रज्ञानाचा अधिक वापर होते तेव्हा निसर्गाचा ऱ्हास होतो. जी कडी हरवली आहे, ती म्हणजे, ते तत्व म्हणजे धर्म असल्याचे मत सरसंघचालकांनी मांडले. त्यांनी यावेळी द इलेव्हन्थ अवर या पर्यावरणावरील चित्रपटाचाही उल्लेख केला. निसर्गासोबत जगायचे तर संयम अत्यावश्यक असल्याचे सरसंघचालक म्हणाले. आपल्या प्राचीन ऋषीमुनींना या असमाधानाचे कारण अगोदरच कळले होते. ज्यांना वेळ आणि शांतीचे महत्त्व जाणवले होते. त्यांनी तप सिद्धीद्वारे त्याचे सत्य शोधले होते. त्यांना जाणवले की एकच आत्मा सर्व प्राण्यांमध्ये व्यापून आहे.
एकदा हे सत्य साकार झाले की समाधान मिळते. एकतेची जाणीव शरीर, मन आणि बुद्धी यांना जोडते. ते व्यक्ती, समाज आणि निसर्गाला जोडते. धर्म हा संतुलन जोडणारे तत्व असल्याचे भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही हिंदू राष्ट्राच्या जीवन मोहिमेची उत्क्रांती आहे. त्यातील पहिला टप्पा हा समाज तयार करणे हा आहे, पण ते कार्य अद्याप अपूर्ण असल्याचे सरसंघचालक म्हणाले. संघाचे कार्य भारतातील प्रत्येक स्तरात, गावात आणि वर्गात विस्तारण्याची योजना आहे.
हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी आपण समाजाच्या प्रत्येक वर्गापर्यंत, सर्व विविधतेतून पोहोचले पाहिजे यावर त्यांनी जोर दिला. तर हिंदू म्हणून ओळख न देणाऱ्या समुदायांशी संघ संवाद साधत असल्याचे आग्रही मत त्यांनी मांडले. त्यांचे पूर्वज हिंदू होते. त्यामुळे एकत्र चालण्यासाठी आपण संवाद वाढवू. ते संघाच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत नसले तरी समाजाच्या भल्यासाठी सगळेच काम करत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालकाने केले.
