Download App

आठ महिन्यानंतर गोरक्षक मोनू मानेसरला अटक; मुस्लिम तरुणांना जिवंत जाळल्याचा आरोप

Monu Manesar : राजस्थानातील दोन मुस्लिम तरुणांना जिवंत जाळल्याप्रकरणी गोरक्षक मोनू मानेसरच्या हरयाणा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हरयाणामधील आयएमटी परिसरात हरयाणा पोलिसांनी साध्या वेशात मोनू मानेसरवर अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

Maratha Reservation : पाहिजे तेवढे जीआर काढा, आम्ही न्यायालयात आव्हान देणार; ओबीसी नेत्यांनी दंड थोपटले

16 फेब्रुवारी 2023 रोजी हरयाणाच्या भिवानीमध्ये बोलेरे गाडी जळालेली अवस्थेत आढळून आली होती. या गाडीमध्ये दोन जणांचे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले होते. यामध्ये राजस्थानातील नासिर आणि जुनैद या दोन तरुणांना जिवंत जाळण्यात आल्याचं समोर आलं होतं. या हत्या प्रकरणाचा आरोप मोनू मानेसरवर करण्यात आला होता. तेव्हापासून मोनू मानेसर पोलिसांच्या नजरा चुकवत फरार होता.

फडणवीस बेईमानी करणार नाही; जरांगेंना भिडेंचे बळ; आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिला कानमंत्र

या हत्याकांडात मोनू मानेसर हा चांगलाच चर्चेत आला होता. काही दिवसांपूर्वीच मोनू मानेसरने एक व्हिडिओ प्रकाशित केल्यानंतर हरयाणातील नूहमध्ये हिंसाचार घडल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणानंतरही मोनू मानेसर समोर आला नव्हता.

‘जिंकले तर इतिहास घडेल आणि जिंकून दिलं नाही तरी इतिहास घडेल’, शिवशक्ती यात्रेतून पंकजा मुंडेंची गर्जना

कोण आहे मोनू मानेसर?
मोनूने आठ वर्षांपूर्वी बजरंग दलात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांने गोरक्षकाचं संवर्धन करण्याचं काम हाती घेतलं. गो-तस्करीपासून गायांचं संरक्षण करण्याची मोहिमही त्याने सुरु केली होती. त्याने हरियाणामध्ये मोठं नेटवर्क तयार केलं होतं. गायींच्या तस्करीची माहिती पोलिसांच्या आधी मोनू मानेसरच्या कार्यकर्त्यांना मिळत असे. 2019 साली गो-तस्करांचा पाठलाग करताना त्याच्यावर गोळीबार झाल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता.

भारतात डिजिटल रुपया येणार? RBI कडून मोठी घोषणा…

गोळी लागल्याने तो जखमी झाला. यानंतरही तो स्वस्थ बसले नाहीत, त्याने गो-तस्करीच्या विरोधात मोठी मोहीम सुरू केली आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आपले जाळे पसरवून गोवंश तस्करीला खुले आव्हान दिले. यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमधील भिवानी येथे जुनैद-नासीर या दोन तरुणांना बोलेरो गाडीत जिवंत जाळल्याप्रकरणी मोनू मानेसरचे नाव चर्चेत आले.

दरम्यान, मागील आठ महिन्यांपासून फरार असलेल्या मोनू मानेसरच्या अखेर हरयाणा पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून हरयाणा पोलिसांकडून त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं. दरम्यान, नूंह कोर्टानं त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, गुरुग्राम पोलिसांचं म्हणणं आहे की, त्यांनी मोनू मानेसरला अटक केलेली नाही तर सीआयए स्टाफनं त्याला ताब्यात घेतलं.

Tags

follow us