‘जिंकले तर इतिहास घडेल आणि जिंकून दिलं नाही तरी इतिहास घडेल’, शिवशक्ती यात्रेतून पंकजा मुंडेंची गर्जना

‘जिंकले तर इतिहास घडेल आणि जिंकून दिलं नाही तरी इतिहास घडेल’, शिवशक्ती यात्रेतून पंकजा मुंडेंची गर्जना

Panjaka Munde Shiv Shakti Rally : माझी उत्तरं मी शोधली आहेत. माझं जीवन यशस्वी होईल की नाही हे माहिती नाही. माझी भूमिका कधीही अयशस्वी होऊ देणार नाही. याचा मला विश्वास आहे. मी लढले आणि जिंकले तर इतिहास घडेल आणि मला जिंकून दिलं नाही तरी इतिहास घडेल हे मी दाखवून दिलं, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती यात्रेच्या समारोपतून दिला.

गेल्या काही दिवसांपासून 2024 च्या बीड लोकसभेसाठी प्रितम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. या चर्चांना पूर्णविराम देत पंकजा मुंडे यांनी पक्षालाही इशारा दिला आहे. आज पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेचा समारोप परळी येथे झाला. यावेळी त्यांनी रॅलीला संबोधीत केलं.

Pankaja Munde कुठून निवडणूक लढवणार? म्हणाल्या माझा निर्णय झाला…

पंकजा मुंडे म्हणाल्या की मी देणारी आहे, घेणारी नाही. त्यामुळे कोणीही हा विचार करु नये की ताई काही घेतील. प्रितमकडून काही घेतील. काही तरी निर्णय झाला असेल. मी प्रितमला देण्याच्या भूमिकेत आहे. मी तिची आई आहे, बाप आहे, मोठी बहिण आहे. तिचं घेऊन मी राजकारण करणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राने, पक्षाने आणि जगाने समजून घ्यावं की प्रितम मुंडेला उचलून मी बसणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी भाजपला दिला आहे.

‘सध्या वादळापूर्वीची शांतता, पंकजा मुंडे लवकरच….’; नाना पटोलेंचा मोठा दावा

कदाचित 2019 मध्ये माझी जेवढी शक्ती होती तेवढी शक्ती 2024 ला असेल का नाही हे मला सांगता येत नाही. जशी मी 2019 ला शून्य झाले होते आणि आता स्वत:ला निर्माण केलं. तसं तू स्वत:ला निर्माण कर, माझा तुला आर्शिवाद आहे, असे पंकजा मुंडे यांनी प्रितम मुंडे यांना सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube