Download App

Karnataka Election 2023 : मतदान केले तरच तुम्हाला टीकेचा हक्क, मतदानानंतर मूर्ती दाम्पत्याचं आवाहन

Murthy Couple Vote for Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka) आज 10 मे ला मतदान होत आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी (counting of votes) होणार आहे. मतदानासाठी अवघे काही तासच शिल्लक राहीले आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकमधील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार आहेत. हे मतदान राज्यातील 2 हजार 615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. राज्यभरातील एकूण 58 हजार 545 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा देण्यात येत आहे. मतदानादरम्यान एकूण 75 हजार 603 बॅलेट युनिट (BU), 70 हजार 300 कंट्रोल युनिट (CU) आणि 76 हजार 202 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत.

यावेळी कर्नाटकचे नागरिक असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बंगळूरूतील जयानगर याठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी हे दाम्पत्य सकाळी सहा वाजताच मतदानासाठी आल्याचं पाहायाला मिळालं.

या दाम्पत्याने ज्येष्ठ नागरिक असूनही एवढ्या उत्साहाने मतदानाला येत नागरिक आणि विशेषतः तरूणांना मतदानाचा संदेश दिला आहे. यावेळी या दोघांनीही आपली प्रतिक्रिया दिली. नारायण मूर्ती म्हणाले की, ‘जर आपण मतदान करणार नसु तर आपल्याला राज्या व्यवस्थेवर टीका करण्याचा देखील हक्क नाही. त्याच बरोबर यावेळी ते असं देखील म्हटले की, मला जर काही महिती नसेल तर मी राजकारणावर काही प्रतिक्रिया देणार नाही. कारण योग्य माहिती नसताना बोलल्याने तुम्ही तुमची विश्वासार्हता गमावता. ‘

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात, 2,615 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

तर यावेळी नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांनी म्हटले की, आम्ही ज्येष्ठ नागरिक असूनही सकाळी सहा वाजता मतदान कारायालवा आलो आहोत. आमच्याकडून काही शिका मतदान हे लोकशाहीचा गुप्त भाग आहे. मतदान होत नसेल तर ती लोकशाही नाही. त्यामुळे तुम्हाला बदल, विकास हवा असेल तर मतदानाचा आदर करा.’ असं आवाहन यावेळी तरूणांना आणि नागरिकांना मूर्ती दाम्पत्याने केलं आहे.

Tags

follow us