Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात, 2,615 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात, 2,615 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

Voting Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka) आज 10 मे ला मतदान होत आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी (counting of votes) होणार आहे. मतदानासाठी अवघे काही तासच शिल्लक राहीले आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकमधील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार आहेत. हे मतदान राज्यातील 2 हजार 615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. राज्यभरातील एकूण 58 हजार 545 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा देण्यात येत आहे. मतदानादरम्यान एकूण 75 हजार 603 बॅलेट युनिट (BU), 70 हजार 300 कंट्रोल युनिट (CU) आणि 76 हजार 202 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत.

Karnataka Election 2023 : आजची रात्र वैऱ्याची; कर्नाटक विधानसभेसाठी उद्या मतदान

राज्यभरातील एकूण 5 कोटी 31 लाख 33 हजार 54 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये दोन कोटी 67 लाख 28 हजार 53 पुरुष मतदार तर दोन कोटी 64 लाख 74 महिला मतदार आहेत. तसेच 4 हजार 927 इतक्या संख्येनं इतर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण दोन हजार 615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये दोन हजार 430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आहेत तर एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून आपलं नशिब आजमावत आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदान पेटीत बंद होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube