Download App

चार महिन्यांचा मुलगा थेट कोट्यधीश! Narayan Murthy यांच्याकडून नातवाला 240 कोटींचे शेअर्स गिफ्ट

Narayan Murthy : चार महिन्यांचा मुलगा थेट कोट्याधीश झाल्याच्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. कारण या मुलाचे नाव आहे. एकाग्र रोहन मूर्ती. या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. हा मुलगा म्हणजे इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती ( Narayan Murthy ) यांचा नातू आहे.

धनवेचा खून पूर्व वैमनस्यातूनच; पोलिस अधीक्षकांनी सांगितली कहाणी

मूर्ती यांनी आपल्या चार महिन्याच्या नातवाला तब्बल 240 कोटींचे शेअर्स गिफ्ट दिले आहेत. त्यामुळे आता मूर्ती यांचा नातू देशातील सर्वात तरुण कोट्यधीश होण्याची शक्यता आहे. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती नुकतेच आजी आजोबा झाले आहेत. त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि त्यांची पत्नी अपर्णा कृष्णन यांनी नोव्हेंबर महिन्यात मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव एकाग्र असं ठेवण्यात आला आहे.

Box Office: सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योधा’ने दाखवली जादू, जाणून घ्या तिसऱ्या दिवशीची कमाई

त्यामुळे आता नारायण मूर्तींचा नातू एकाग्र हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या माहिती आणि तंत्रज्ञान सेवा कंपनीतील 0.4% भाग भांडवलाचा मालक आहे. त्याच्याकडे कंपनीचे 15 लाख शेअर्स आहेत. तर नातवाला हे शेअर्स गिफ्ट केल्यानंतर इन्फोसिस मधील मूर्तींचा हिस्सा 0.40 टक्क्यांवरून 0.36% म्हणजेच 1.51 कोटी शेअर्स पेक्षा कमी झाला आहे. तसेच नातवाला शेअर्स गिफ्ट करताना मूर्ती यांच्याकडून हा व्यवहार ऑफ मार्केट करण्यात आला.

आता टीकाकार श्रीनिवास पवारांना उत्तर देतील का? आव्हाडांचा थेट सवाल

नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिस ही कंपनी सुरू करण्याच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर 1981 साली मूर्ती यांनी या कंपनीची स्थापना केली. आज ही कंपनी भारतातील प्रतिष्ठित कंपन्यांपैकी एक आहे. मूर्ती यांच्या या प्रवासामध्ये त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. कंपनीची सुरुवात करताना सुधा मूर्ती यांनीच नारायण मूर्ती यांना आर्थिक पाठबळ दिलं. मात्र कंपनीला 25 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सुधा यांनी कंपनीच्या नेतृत्वातून निवृत्ती घेतली. त्या आता सामाजिक कार्यामध्ये जास्त सक्रीय आहेत.

तसेच नुकतेच सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांचा महिला दिनी सन्मान करण्यात आला आहे. मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मूर्ती यांच्या नियुक्तीविषयी घोषणा केली.

follow us

वेब स्टोरीज