Download App

Modi Cabinet : प्रतापराव जाधव, रक्षा खडसे… नरेंद्र मोदींसोबत कोणते नेते घेणार शपथ? पाहा यादी

तप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारचा आज शपथविधी होणार आहे.

Modi Cabinet : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारचा आज शपथविधी होणार आहे. मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एनडीएतील अनेक खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळात कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे? याची समोर आली.

प्रतापराव विठ्ठलाच्या कृपेने मंत्री, आम्ही मोदींचे कृतज्ञ…; कुटुंबाने मानले मोदींचे आभार 

मिळालेल्या माहितीनुसार, जीतनराम मांझी, जयंत चौधरी, तसेच अनुप्रिया पटेल यांना दिल्लीतून बोलावणं आलं. तर राज्यातून मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे आणि प्रतापराव जाधवांना यांना प्रथमच मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे.

दरम्यान, शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदींच्या निवासस्थानी मंत्रिपदाची शपथ घेणारे खासदार पोहोचल्याचे वृत्त आहे. यामध्ये एलजेपीचे चिराग पासवान, भाजपचे पीयूष गोयल, एस जयशंकर, शिवराज सिंह चौहान आणि जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी आणि इतर अनेक नेत्यांचा समावेश आहे. शपथविधीपूर्वी NDA नेते 7 लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानी मोदींसोबत पारंपारिक चहापानाला उपस्थित राहतील. यामध्ये मोदी मंत्र्यांना नवीन सरकारमध्ये कसे काम करावे लागेल याची माहिती देणार आहेत.

खासदार म्हणून शपथविधीला आलो पण… मंत्रिपद मिळाल्याने मोहळांना अश्रू अनावर 

कोण कोण घेणार मंत्रिपदाची शपथ?
1. राजनाथ सिंह
2. नितीन गडकरी
3. जयंत चौधरी
4. जीतनराम मांझी
5. रामनाथ ठाकूर
6. चिराग पासवान
7. एचडी कुमारस्वामी
8. ज्योतिरादित्य सिंधिया
9. अर्जुन राम मेघवाल
10. प्रतापराव जाधव
11. रक्षा खडसे
12. जितेंद्र सिंग
13. रामदास आठवले
14. किरेन रिजुजू
15. राव इंद्रजीत सिंग
16. शांतनू ठाकूर
17. मनसुख मांडविया
18. अश्विनी वैष्णव
19. बंदी संजय कुमार
20. जी किशन रेड्डी
21. हरदीप सिंग पुरी
22. व्हीएल वर्मा
23. शिवराज सिंह चौहान
24. शोभा करंदलाजे
25. रवनीत सिंग बिट्टू
26. सर्वानंद सोनोवाल
27. अनुप्रिया पटेल
28. पी चंद्रशेखर पेम्मासानी
29. मोहन नायडू
30. ललन सिंग
31. मनोहर लाल खट्टर
32. पियुष गोयल

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा फोन आला होता, मात्र ते इंडिया इंडिया आघाडीतील सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर याबाबत निर्णय घेतील. तर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे.

follow us

वेब स्टोरीज