Download App

Prajwal Revanna : JDS कोंडीत! ‘त्या’ प्रकारानंतर देवेगौडांच्या नातवाची पक्षातून हकालपट्टी

जेडीएसने प्रज्ज्वल रेवन्ना यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने हा मुद्दा हातोहात उचलत रेवन्ना यांच्या अटकेची मागणी करत ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. 

Prajwal Revanna : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांचे नातू प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवन्ना यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या अश्लील व्हिडीओ प्रकरणाच्या चौकशीसाठी आता विशेष तपास पथक (Special Investigation Team) तयार केले आहे. आता यानंतर या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. जेडीएसने प्रज्ज्वल रेवन्ना यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने हा मुद्दा हातोहात उचलत रेवन्ना यांच्या अटकेची मागणी करत ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत.

एचडी देवेगौडांच्या नातवाचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल, एसआयटी स्थापन होताच देशातून फरार

कर्नाटकच्या लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी रेवन्ना यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर रविवारी त्यांच्या विरोधात एफआयआ दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मागणीवरून शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. तीन सदस्यीय एसआयटीचे प्रमुख एडीजी (सीआयडी) विजय कुमार सिंह असतील. SIT मध्ये सुमन डी. पेणेकर (DG, CID) आणि म्हैसूरच्य IPS सीमा लाटकर असणार आहेत. लकवरच तपास पूर्ण करण्याच्या सूचना एसआयटीला देण्यात आल्या आहेत.

33 वर्षीय प्रज्वल रेवन्ना सध्या कर्नाटकातील हसनमधून खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ही जागा जिंकली होती. यापूर्वी एचडी देवेगौडा यांनी 2004 ते 2019 पर्यंत या जागेवर सातत्याने विजय मिळवला होता. या प्रकारानंतर सगळा पक्षच अडचणीत आला आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचीही कोंडी झाली आहे. कारण, लोकसभा निवडणुकीआधीच दोन्ही पक्षांची युती झाली होती.

Karnataka Politics : कर्नाटकात पुन्हा ऑपरेशन लोटस? मुख्यमंत्र्यांच्या नव्या दाव्याने खळबळ!

प्रज्ज्वल रेवन्ना देशातून फरार ?

रेवन्ना यांच्या अश्लिल व्हिडिओमुळे कर्नाटकात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक सरकारने एसआयटी स्थापन केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना देश सोडून पळून गेल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. परंतु, ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने जेडीएसची फजिती तर झालीच आहे. पण, काही कारण नसताना भाजपालाही या प्रकरणाचा त्रास होऊ लागला आहे.

या प्रकरणामुळे काँग्रेसला मात्र आयतेच कोलीत मिळाले आहे. काँग्रेसने हा मुद्दा हातोहात उचलत रेवन्ना यांच्या अटकेची मागणी करत ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत.

follow us

वेब स्टोरीज