Arvind Kejriwal : भाजपशासित कर्नाटक राज्यात यावर्षी विधानसभेच्या निवडणुका (Karnataka Elections 2023) होणार आहे. आम आदमी पार्टीने (AAP) या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभुमीवर आज पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्ला केला.
ते म्हणाले,की डबल इंजिन सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. कर्नाटकात भाजप (BJP) आमदाराच्या मुलाच्या घरात आठ कोटी रुपये पकडले. त्याला अजूनही अटक केलेली नाही. कदाचित पुढील वर्षात त्याला पद्मभूषण दिला जाईल. आठ कोटी त्याच्या घरात सापडले तो मोकाट आहे पण इकडे मनिष सिसोदियांना अटक करण्यात आली, पण काहीच सापडले नाही. या डबल इंजिन सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप त्यांनी केला.
वाचा : Arvind Kejriwal : पक्ष आणि नाव चोरलं तरीही उद्धव ठाकरे वाघच
कर्नाटकात भाजप आमदार विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार याला 40 लाखांची लाच घेताना पकडले. यानंतर पोलिसांनी छाप्यात प्रशांतच्या घरातून सहा कोटींपेक्षा जास्त रुपयांची रोकड जप्त केली. या मुद्द्यावर केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली.
केजरीवाल अडचणीत: उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांसह आणखी एका मंत्र्याचा राजीनामा
ते पुढे म्हणाले, की कर्नाटकात सगळ्या गोष्टी विकल्या जात आहेत. प्रत्येक गोष्टीचे रेट चालू आहेत. लेक्चरर होण्यासाठी 25 लाख रुपये द्यावे लागत आहेत. पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जातात आणि त्यांच्या भाषणात आम आदमीचा उल्लेख करतात. पण आम्ही त्रिपुरा, नागालँड, मेघालयात निवडणुका लढल्याच नाहीत. तरीही पीएम मोदी घाबरले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
https://www.youtube.com/watch?v=A2paZUcJAn8