Download App

Bihar Politics : आधी मासे, आता संत्री! भाजपला खिजवण्यासाठी यादव-सहनींचे ऑरेंज पॉलिटिक्स

Bihar Politics : बिहारच्या राजकारणात सध्या विकासशील इंसान पार्टीचे मुकेश सहनी आणि राजदचे तेजस्वी यादव यांच्या नव्या पॉलिटिक्सची जोरदार चर्चा सुरू आहे. तेजस्वी यादव यांनी त्यांच्या एक्स हॅण्डलवरून एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तेजस्वी यादव संत्री खाताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर मुकेश सहनी आहेत. ते सुद्धा संत्री खात आहेत. या संत्र्याच्या रंगावरून दोन्ही नेत्यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.

तेजस्वी यादव यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले, हॅलो फ्रेंड्स, आज हेलिकॉप्टर मध्ये नारंगी पार्टी झाली. संत्र्याच्या रंगावरून तर ते (भाजप) चिडणार नाहीत ना? असा खोचक सवाल तेजस्वी यादव यांनी विचारला आहे. याआधी तेजस्वी यादव यांचा हेलिकॉप्टरमध्ये मासे खातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. चैत्र नवरात्रीचे निमित्त शोधून काढत भाजप नेत्यांनी तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर तेजस्वी यादव यांनी स्पष्टीकरण देत तो व्हिडिओ जुना असल्याचे म्हटले होते.

Bihar Politics : उमेदवार निवडीत पॉलिटिक्स; एकाच वेळी 22 नेत्यांनी सोडली चिराग पासवानांची साथ

यानंतर मात्र त्यांनी पुन्हा एक संत्री खातानाचा व्हिडिओ पोस्ट करत भाजपला चिमटा काढला. मुकेश सहनी यांनीही भाजपावर जोरदार टीका केली. आज ऑरेंज आहे, संत्री खात आहोत. आजही आम्हाला वाटत आहे की भाजपवाल्यांच्या पोटात दुखेल की आम्ही संत्री का खात आहोत. यालाही ते धर्माशी जोडतील. आता हे संत्र्याच्या रंगावरून सुद्धा म्हणतील की हा आमचा भगवा रंग आहे. खाण्याची वस्तू आहे तर आम्ही खाणारच ना, तुम्ही लोक जास्त त्रास करून घेऊ नका.

follow us

वेब स्टोरीज