Download App

BJP Manifesto : रोजगाराची गॅरंटी अन् 3 कोटी घरे; भाजपाच्या ‘मोदी की गॅरंटी’ जाहीरनाम्यात काय काय?

BJP releases Manifesto for 2024 Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीने राजधानी नवी दिल्लीत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जाहिरनाम्याची पहिली प्रत सरकारी योजनेच्या एका लाभार्थ्याला देण्यात आली. जाहीरनाम्यात भाजपाने आगामी काळात काय संकल्प केला आहे याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिली. देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, गरीबांसाठी तीन कोटी घरे बांधण्यासह अन्य महत्वाची कामे करण्याचा संकल्प केला आहे, असे पीएम मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. यासाठी आगामी काळात 75 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपचार मिळवून देण्याचा संकल्प भाजपने केला आहे. मोफत रेशन देण्याची योजना पुढील पाच वर्षे सुरू राहिल असे मोदी म्हणाले. देशातील कोट्यावधी कुटुंबांचे वीजबिल झिरो करणे आणि विजेपासून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार आहोत. यासाठी सरकारने पीएम सूर्यघर मोफत वीज योजना लागू करण्यात आली आहे.

पीएम मुद्रा योजनेचे कर्ज 10 लाखांवरून 20 लाख

भाजपाच्या संकल्पपत्राची प्रतिक्षा संपूर्ण देश करत असतो याचं मोठं कारण म्हणजे मागील दहा वर्षांच्या काळात घोषणापत्रातील प्रत्येक मुद्द्यावर आम्ही अंमलबजावणी केली आहे. भाजपाचा जाहीरनामा देशातील युवक, महिला, गरीब आणि शेतकरी वर्गाला बळकट करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. मागील काही वर्षात मुद्रा योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांचे व्यवसाय सुरू करता आले. या योजनेचे यश पाहता आगामी काळात या योजनेंतर्गत मिळणारे कर्ज 10 लाखांवरून 20 लाख करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Lok Sabha 2024 : ठरलं तर! कंगनाविरोधात काँग्रेसचा हुकूमी एक्का; माजी CM चा मुलगा मैदानात

आणखी 3 कोटी घरे, पाइपलाइनद्वारे गॅस देणार

भाजप सरकारने देशातील गरीबांना चार कोटी पक्के घरे बांधून दिली आहेत. राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीनंतर आता आणखी 3 कोटी घरांचे बांधकाम करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. आतापर्यंत आम्ही स्वस्त दरात गॅस सिलिंडर दिले. आता पाइपलाइनद्वारे घराघरात गॅस पुरवठा करण्यासाठी वेगाने काम करत असल्याचे मोदी म्हणाले.

राष्ट्रीय सहकार धोरण तयार करणार

देशातील दहा कोटी शेतकऱ्यांना पीएन किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत राहिल. सहकारितेसह समृद्धी दृष्टीकोनाबरोबरच राष्ट्रीय सहकारिता निती सादर केली जाईल. देशभरातील डेअरी आणि सहकारी समित्यांच्या संख्येत मोठी वाढ केली जाईल. मागील दहा वर्षांच्या काळात देशातील जवळपास 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत.

सन 2025 मध्ये भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. तसेच डिजीटल जनजातीय कला अकादमीही स्थापन केली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

जनता जनार्दन मोदींच्या ‘गॅरंटी’वर खूश पण…; मोठ्या सर्व्हेक्षणात मतदारांनी मनातलं सांगितलं!

तीन प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे काम वेगात सुरू 

भाजप तीन प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार आहे. यामध्ये सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश राहिल. या तीन इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून विकसित भारताचा पाया मजबूत केला जाईल. सोशल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक संस्थान देशभरात सुरू केले जातील. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून देशभरात राजमार्ग, रेल्वे, वायूमार्ग आणि जलमार्गांचे आधुनिकीकरण केले जात आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून 5 जी नेटवर्कचा विस्तार केला जात आहे. 6 जी नेटवर्कवरही काम केले जात आहे. तसेच इंडस्ट्री 4.0 चा विचार करून डिजिटल इन्फ्रोस्ट्रक्चरचा विकास केला जात असल्याचे मोदी म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज