Download App

“आधी संघाची गरज पडायची, आता भाजप सक्षम, स्वतःच पक्ष चालवतो”; नड्डांचं मोठं विधान

वाजपेयी यांच्या काळात पक्षाला आरएसएसची गरज लागायची कारण त्यावेळी भाजप छोटा पक्ष होता. पण आज आम्ही विस्तारलो आहोत. भाजप आता स्वतःत स्वतःला चालवत आहे.

JP Nadda on RSS : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचं (JP Nadda) एक वक्तव्य आज राजकारणात केंद्रस्थानी आहे. आता आम्ही सक्षम आहोत. भाजप पक्ष आमचा आम्ही चालवतो असे विधान नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केलं. त्यांच्या या वक्तव्यावर देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबरील संबंधांबाबत नड्डा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर नड्डा म्हणाले, वाजपेयी यांच्या काळात पक्षाला आरएसएसची गरज लागायची कारण त्यावेळी भाजप छोटा पक्ष होता आणि कमी सक्षम होता. सुरुवातीला आम्ही अक्षम असू, थोडे कमी असू, आरएसएसची गरज होती. पण आज आम्ही विस्तारलो आहोत. आधीपेक्षा जास्त सक्षम आहोत. भाजप आता स्वतःत स्वतःला चालवत आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे काय बोलले?; भाजप ‘आरएसएस’वरही बंदी आणेल

भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्याची गरज आहे का या प्रश्नाच्या उत्तरात नड्डा म्हणाले, पक्ष आता मोठा झाला आहे. पक्षातील नेते त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. आरएसएस एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन आहे. तर भाजप एक राजकीय पक्ष आहे. आरएसएस वैचारिक पातळीवर काम करतो. आम्ही आमच्या पद्धतीने आमची प्रकरणे हाताळतो आणि राजकीय पक्षांनी असेच केले पाहिजे. उत्तर प्रदेशातील मथुरा आणि वाराणसीतील वादग्रस्त ठिकाणी मंदिर बांधण्याची भाजपाची कोणतीच योजना नाही. याबाबत पक्षात कोणती चर्चाही सुरू नाही, असे नड्डा म्हणाले.

भाजप आरएसएसवरही बंदी आणेल : उद्धव ठाकरे

भाजपाच्या मनात पाकिस्तान आहे. त्यांना अजूनही नवाज शरीफ यांचा केक आठवत आहे. फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच पुलवामा हल्ला घडवून आणला का? मला वाटतंय की आता आरएसएसलाच धोका निर्माण झाला आहे. कारण उद्या ते आरएसएसवरच बंदी आणतील. ते जर म्हणतात की काँग्रेस राम मंदिरावर बुलडोजर चालवील तर मी म्हणतो की भाजप आरएसएसवर बंदी आणेल, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

BJP Manifesto : रोजगाराची गॅरंटी अन् 3 कोटी घरे; भाजपाच्या ‘मोदी की गॅरंटी’ जाहीरनाम्यात काय काय?

follow us