Download App

केजरीवालांना झाली घाई पण, काँग्रेसचे वेट अँड वॉच; विरोधकांच्या बैठकीतही पत्ते झाकलेलेच!

Mallikarjun Kharge : केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देशभरात फिरत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यशही येताना दिसत आहे. काही पक्षांचा पाठिंबाही मिळत आहे. मात्र, काँग्रेसने (Congress) अजूनही आपले पत्ते उघडलेले आहेत. आज पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक होती. या बैठकीत तरी काहीतरी घडामोडी घडतील असे वाटत होते. मात्र, तसे काही घडल्याचे दिसत नाही. कारण, बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून काँग्रेस सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

या बैठकीत अध्यादेशाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी यासाठी स्वतः केजरीवाल यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, या बैठकीत या मुद्द्यावर यावर काही चर्चा झाल्याचे दिसत नाही. विशेष म्हणजे, या बैठकीत स्वतः केजरीवाल सुद्धा उपस्थित होते.

खर्गे म्हणाले, अध्यादेशाला पाठिंबा देणे किंवा न देणे हे काही बाहेर घडत नाही तर संसदेत होते. ज्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होईल किंवा त्याआधी सर्व पक्ष एकत्र बसून अजेंडा तयार केला जातो. संसदेत कोणते मुद्दे उपस्थित करायचे, काय रणनिती असेल हे चर्चा करून ठरवले जाते. सर्व पक्षांचे नेते या बैठकीसाठी येत असतात. असे असताना या प्रकाराचे बाहेर का इतकी चर्चा केली जात आहे, हे कळत नाही. संसदेचे अधिवेशन सुरू होईल त्याआधी याबद्दल निर्णय घेऊ, असे खर्गे यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचीही मोठी अडचण 

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी स्वतः काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता. मात्र, काँग्रेस नेत्यांनी अद्याप यावर काही प्रतिसाद दिलेला नाही. या अध्यादेशासाठी काँग्रेसने पाठिंबा देऊ नये असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. दिल्ली आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी आम आदमी पार्टीने काँग्रेसचा पराभव केला आहे. तसेच या पक्षाचे राजकारण काँग्रेसला अडचणीत आणणारे आहे. त्यामुळे केजरीवाल यांना पाठिंबा देऊ नये असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे. त्यामुळे या प्रकरणी आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेस जिंकणारच; विरोधकांच्या बैठकीआधीच राहुल गांधींचा एल्गार

Tags

follow us