Download App

दुष्काळ-अतिवृष्टी झळा! भारतात ७.२ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या; महाराष्ट्राची स्थिती काय?

रतात २०२० च्या तुलनेत ७.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आत्महत्यांचे प्रमाण ६.२ टक्क्यांनी वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये (२२,२०७) झाल्या आहेत.

  • Written By: Last Updated:

Farmer suicide rate : दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे १ एप्रिल २०२३ ते ४ जुलै २०२४ दरम्यान १ हजार १८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात बेळगाव जिल्ह्यामधील १२२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. एकीकडे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि एनसीआरबीकडे दाखल वगेवेगळ्या कारणांनी आत्महत्या प्रकरणांत कर्नाटक राज्य देशात पाचव्यस्थानी आहे. (National Crime Records Bureau) महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालनंतर कर्नाटकात राज्य देशामध्ये ५ व्या स्थानावर आहे. सुमारे १३ हजारांपेक्षा अधिक जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यामध्ये सुमारे बाराशे अन्‍नदात्यांचा समावेश आहे.

पुन्हा अशा प्रकारची अवमानस्पद वागणूक देऊ नये; किरीट सोमय्यांचा लेटरबॉम्ब, दानवे, बावनकुळेंवर संतापले

बेळगाव जिल्ह्यात चालू वर्षात १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हावेरीत १२० आणि धारवाड १०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या नोंदी गेल्या दीड वर्षामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यात ही आकडेवारी पुढे आलेली आहे. एकीकडे कर्नाटकात २०२२-२३ मध्ये वेगवेगळ्या कारणांनी १३,०५६ जणांनी आत्महत्या केली आहे. देशात एकूण आत्महत्यात कर्नाटकात ८ टक्के आत्महत्या झाल्याची नोंद आहे.

भारतात २०२० च्या तुलनेत ७.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आत्महत्यांचं प्रमाण ६.२ टक्क्यांनी वाढलं आहे. सदर अहवालानुसार सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये (२२,२०७) झाल्या आहेत. तामिळनाडूत १८,९२५ आत्महत्या, मध्य प्रदेशात १४,९६५ आणि पश्चिम बंगालमध्ये १३,५०० आत्महत्या झाल्या आहेत. देशातील ५०.४ टक्के आत्महत्या कर्नाटकासह पहिल्या पाच राज्यांमध्ये झाल्या आहेत.

सोयाबीन उत्पादकांना केंद्राचा दिलासा; 13 लाख टन सोयाबीन खरेदी करणार

उर्वरित ४९.६ टक्के प्रकरणं २३ इतर राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमधून नोंदवली गेली आहेत. एकीकडे शेतकरी पीकहानी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे जीवन संपवीत आहे. दुसरीकडे सामान्यवर्ग व्यावसायिक समस्या, अत्याचार, मानसिक विकार, कौटुंबिक समस्या, एकटेपणाची भावना, हिंसाचार, विविध प्रकाराचे व्यसने, दीर्घकालीन वेदना व आर्थिक संकटाने मेटाकुटीला येऊन आत्महत्या करीत असल्याची नोंद आहे.

follow us