Delhi Children Hospital Fire : राजकोट येथील गेमिंग झोनला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच आता राजधानी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव घडले. शनिवारी रात्री उशिरा येथील हॉस्पिटलला भीषण आग लागली. या आगीत सहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. या दवाखान्यात पाच मुले दाखल आहेत. त्यातील एक व्हेंटीलेटरवर आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील एका बेबी केअर सेंटरला आग लागल्याची माहिती मिळाली होती. ज्यानंतर तातडीने नऊ फायर ब्रिगडे वाहनांना रवाना करण्यात आले. १२ मुलांना येथून बाहेर काढण्यात आले. यापैकी 6 मुलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
#WATCH | Delhi: Morning visuals from a newborn Baby Care Hospital in Vivek Vihar where a massive fire broke out last night claiming the lives of 6 newborn babies.
One newborn baby is on the ventilator and 5 others are admitted to a hospital. pic.twitter.com/cLvIUWIx9e
— ANI (@ANI) May 26, 2024
आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दिल्ली पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी याची चौकशी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत 11 मुलांची सुटका करण्यात आली. उशिरापर्यंत मदतकार्य सुरुच होते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रत्येकाच्या तोंडी हीच चर्चा आहे. आग कशामुळे लागली याची माहिती अजून मिळालेली नाही. त्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत.
राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये भीषण आग, 24 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 12 मुलं
राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये शनिवारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आहे. दरम्यान, मृत्यांमध्ये 12 मुलं असल्याची माहिती मिळाली आहे. आज वीकेंड असल्याने अनेक कुटुंबे आपल्या मुलांसह नेहमीप्रमाणे टीआरपी मॉलच्या गेम झोनमध्ये आले होते. यावेळी अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आग इतकी भीषण होती की धुराचे लोट पाच किमी दूरपर्यंत दिसत होते. आग आणि धुरामुळे अनेक लोक गेम झोनमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.