राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये भीषण आग, 24 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 12 मुलं

राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये भीषण आग, 24 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 12 मुलं

Rajkot gaming zone fire  : राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आहे. दरम्यान, मृत्यांमध्ये 12 मुलं असल्याची माहिती मिळाली आहे. आज वीकेंड असल्याने अनेक कुटुंबे आपल्या मुलांसह नेहमीप्रमाणे टीआरपी मॉलच्या गेम झोनमध्ये आले होते. यावेळी अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आग इतकी भीषण होती की धुराचे लोट पाच किमी दूरपर्यंत दिसत होते. आग आणि धुरामुळे अनेक लोक गेम झोनमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

राजकोटचे जिल्हाधिकारी प्रभाव जोशी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना, या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, ‘दुपारी सव्वा चार वाजता कंट्रोल रूमला आग लागल्याची माहिती देणारा फोन आला. त्यानंतर तातडीने अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. आग विझविण्याचं काम सुरू करण्यात आलं. अजूनही आग विझलेली नाही. आग लागल्याच्या ठिकाणी ढिगाऱ्यात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत 24 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे’

 

युवराज सिंह सोलंकी नावाच्या माणसाचा हा गेमिंग झोन आहे, अशी माहिती राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी दिली. गेमिंग झोनच्या मालकावर निष्काळजीपणाचा आणि त्यामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात येईल, असंही ते म्हणाले आहेत.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज