Download App

हुश्श.. आणखी एक विमान अपघात टळला; पायलटचा Mayday मेसेज अन् विमानाचं लँडिंग

गुरुवारी गुवाहाटी येथून चेन्नईला जाणारे इंडिगोचे विमान (Indigo Flight) इंधनाच्या कमतरतेमुळे बंगळुरूला वळवावे लागले.

New Delhi : गुरुवारी गुवाहाटी येथून चेन्नईला जाणारे इंडिगोचे विमान (Indigo Flight) इंधनाच्या कमतरतेमुळे बंगळुरूला वळवावे लागले. चेन्नई विमानतळावर (Chennai Air Port) गर्दी असल्याने विमानाला तेथे वेळेवर उतरण्यापासून रोखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार आपात्कालीन मार्ग बदला दरम्यान विमान प्रवासी होते. विमान रात्री सव्वा आठ वाजता बंगळुरूत लँडिंग (Bengaluru) करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या पायलटने Mayday सिग्नल पाठवला. एखाद्या गंभीर स्थितीत हा संदेश पाठवला जात असतो. यानंतर दिलासादायक बाब म्हणजे विमानाची बंगळुरू विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आली. ही घटना दोन दिवसांपूर्वीच घडली होती परंतु, आज शनिवारी उजेडात आली. या विमानात 168 प्रवासी  होते.

Mayday मेसेज केव्हा पाठवला जातो

ज्यावेळी विमानात गंभीर तांत्रिक किंवा परिचालन समस्या निर्माण होते त्यावेळी हा संदेश (Mayday Message) पाठवला जातो. यावरुन संबंधित विमानाला तातडीने मदतीची गरज असल्याचे लक्षात येते. या प्रकरणात विमानात इंधन (Fuel) नसल्याने धोका वाढला होता. या घटनेनंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीनंतर घटनेची सर्व माहिती समोर येणार आहे.

पांडुरंगाच्या मर्जीने राजकारणात उलथापालथ होणार अन् अजितदादा मुख्यमंत्री…; मिटकरींचा दावा

या घटनेच्या आधी 12 जून रोजी अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान क्रॅश झाले (Ahmedabad Plane Crash) होते. त्यावेळी पायलटने दुपारी 1.39 वाजता Mayday संदेश पाठवला होता. पण यानंतर एटीसीशी संपर्क तुटला आणि विमान मेघानीनगरमधील नागरी वस्तीत कोसळले. या दुर्घटनेत तब्बल 242 लोकांचा मृत्यू झाला. विमानातील फक्त एकच प्रवासी वाचू शकला.

DGCA चा कठोर निर्णय

एअर इंडियाच्या विमानाच्या या अपघातानंतर नागरी उड्डाण महानिदेशालयाने (DGCA) एअरलाइन्सच्या त्रुटींवर बोट ठेवले आहे. डीजीसीएने एअर इंडियातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीतून मु्क्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच डीजीसीएने एअर इंडियाला 10 दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यात जर असे प्रकार घडले तर परवाना रद्द केला जाऊ शकतो असा इशाराही कंपनीला देण्यात आला आहे.

follow us