Nuh Tourist Bus Catches Fire : हरियाणातील नूंह मध्ये एका टूरिस्ट बसला आग (Nuh Tourist Bus Catches Fire) लागून मोठी दुर्घटना घडली. ही दुर्घटना नूंह जिल्ह्यातील तावडू परिसरातील कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेस हायवेवर घडली. या बसमध्ये ६० प्रवासी होते. यातील १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे आणि २४ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. बसमधील बहुतांश प्रवासी देवदर्शनासाठी निघालेले होते. वाराणसी आणि वृंदावन येथून दर्शन घेऊन माघारी निघाले होते.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. स्थानिक नागरिकांनीही याकामी मदत केली. बराच वेळ मेहनत घेतल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेले प्रवासी पंजाब आणि चंदीगड येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
Road Accident : कार दुभाजकावर धडकली; भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू
या बसमध्ये ६० लोक होते. यामध्ये महिला आणि लहान मुलेही होती. हे सर्व एकमेकांचे नातेवाईक होते. पंजाबमधील लुधियाना, होशियारपूर आणि चंदीगड येथील रहिवासी होते. शुक्रवार-शनिवारच्या रात्री ते देवदर्शन करून घरी निघाले होते. रात्रीच्या दीड वाजण्याच्या सुमारास बसला आग लागल्याचे लक्षात आले. यानंतर एकच गोंधळ उडाला. बसमधील प्रवाशांनी बसमधून बाहेर पडण्यासाठी धावपळ सुरू केली. या धावपळीत आठ जणांचा मात्र मृत्यू झाला. तर बरेच जण जखमी झाले. या जखमींना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी येथे धाव घेतली. जखमी प्रवाशांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मदत केली. बसला आग लागल्याचे आधी कुणाच्याच लक्षात आले नाही. एका युवकाने दुचाकीवरून बसचा पिछा केला आणि बसचालकाला घटनेची माहिती दिली. यानंतर बस थांबली परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. यानंतर मदतकार्य वेगाने सुरू करण्यात येऊन लोकांना बसबाहेर काढण्यात आले.
Road Accident : एअर बॅग उघडल्या पण, मृत्यू टळला नाही; भीषण अपघातात तिघे ठार