Road Accident : एअर बॅग उघडल्या पण, मृत्यू टळला नाही; भीषण अपघातात तिघे ठार

Road Accident : एअर बॅग उघडल्या पण, मृत्यू टळला नाही; भीषण अपघातात तिघे ठार

Road Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे (Road Accident)नाव घेत नाही. आज सलग दुसऱ्या दिवशी या महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कारने अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघातावेळी कारमधील एअर बॅग्स उघडल्या मात्र तरीही कुणाचा जीव वाचला नाही. या अपघातात (Samruddhi Highway) कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्याला सुरुवात केली. दरम्यान, कालच कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातातही तिघा जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा अपघात झाला.

Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर-कारच्या धडकेत तिघे जागीच ठार

याबाबत मिळालेली माहिती अशी, अपघातग्रस्त व्यक्ती छत्रपती संभाजीनगर येथू नाशिकच्या दिशने निघाले होते. त्यांची कार शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दौलताबाद परिसरात आली. यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार समोरून जात असलेल्या अज्ञात वाहनांना धडकली. या अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला. कारमधील एअर बॅग्ज उघडल्या मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातातील मयत व्यक्ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, याआधी शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास असाच भीषण अपघात महामार्गावर घडला होता. महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कारने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात घडली होती. मयत व्यक्ती या जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते. साईबाबांच्या दर्शनासाठी समृद्धी महामार्गाने हे भाविक कारने निघाले होते.

MP Blast : फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा मृत्यू; आजूबाजूचा परिसरही हादरला

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube