काश्मिरात मोठी दुर्घटना ! लष्कराच्या ताफ्यातील ट्रक पेटला, चार जवान शहीद

काश्मिरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय लष्कराच्या ताफ्यातील एका ट्रकने पेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. ट्रक कशामुळे पेटला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, या घटनेत जीवितहानीही झाली आहे. या घटनेत चार जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना जम्मू काश्मिर राज्यातील पुंछ जिल्ह्यातील भाटा धुरिया परिसराजवळ घडली. Casualties feared as an Indian Army […]

Jammu Kashmir

Untitled Design 1

काश्मिरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय लष्कराच्या ताफ्यातील एका ट्रकने पेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. ट्रक कशामुळे पेटला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, या घटनेत जीवितहानीही झाली आहे. या घटनेत चार जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना जम्मू काश्मिर राज्यातील पुंछ जिल्ह्यातील भाटा धुरिया परिसराजवळ घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लष्कराची वाहने भाटा धुरिया परसिरातून जात होती. त्यावेळी अचानक वाहनाने पेट घेतला. ही घटना जिथे घडली ते ठिकाण पुंछ जिल्ह्यापासून जवळपास 90 किलोमीटर अंतरावर आहे.

या घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होत आहेत. या घटनेची चौकशी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेवर अद्याप कोणतेच अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. पोलिसांचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

Exit mobile version