Download App

ED कारवाई की नवं समीकरण? PM मोदींसोबत सावलीसारखे वावरणाऱ्या सोरेन यांनी वाढवलं ‘इंडिया’चं टेन्शन

PM Modi in Jharkhand : दिवाळीत पीएम मोदींनी (PM Modi) झारखंड राज्याचा दौरा केला. दोन दिवस मोदी राज्यात होते. येते त्यांनी विविध कार्यक्रमांत हजेरी लावली. दौरा तसा सरकारी होता. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) सावलीसारखे त्यांच्याबरोबर राहिले. मोदींचे आगमन होण्याच्या एक तास आधीच सोरेन विमानतळावर हजर होते. इतकेच काय मोदींच आगमन असो की भाषण असो येथे कुठेच दोघांच्या वक्तव्यात कटुता किंवा राजकीय टोलेबाजी दिसली नाही. तसे पाहिले तर हेमंत सोरेन जेएमएम-काँग्रेस-राजद सरकारचे मुख्यमंत्री आहेत. विरोधी पक्षाचा मुख्यमंत्री इतक्या सहृदयतेने पंतप्रधानांचे स्वागत करतो म्हटल्यानंतर चर्चा तर होणारच. तशी चर्चा आता झारखंडच्या राजकारणात सुरू झाली आहे.

हेमंत सोरेन आणि त्यांच्या कार्यालयाने पीएम मोदींच्या दौऱ्यासंबंधी सात ट्विट केले. सीएम सोरेन आता मोदी सरकारबरोबरील बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. मोदी 14 नोव्हेंबर रोजी रात्री विमानतळावर आले तेव्हा सोरेन तेथे आधीच उपस्थित होते. त्यांनी अत्यंत उत्साहात मोदींचे स्वागत केले. मोदींनीही तितकाच प्रतिसा दिला. त्यांच्या या भेटीचीही जोरदार चर्चा होत आहे.

PM Narendra Modi Song: मोदींनी लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी मिळालं नामांकन

15 नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रम, बिरसा मेमोरियल म्युजियम परिभ्रमण आणि खुंटी येथे आयोजित मुख्य कार्यक्रम चर्चेत राहिले. या दोन्ही कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची देहबोली वेगळीच होती. दोघांच्या हास्यवदनाने सुरू असलेल्या संभाषणांचे फोटो व्हायरल झाले. विशेष म्हणजे, दोघांनीही आपल्या भाषणात एकही राजकीय शब्द उच्चारला नाही ज्यामुळे वाद निर्माण होईल. या दौऱ्यात सारेकाही याच पद्धतीने सुरू होते.

मोदी माघारी निघाले त्यावेळीही सोरेन त्यांच्याबरोबर होते. त्यांच्या या बदललेल्या वागणुकीमुळे मित्र पक्ष काँग्रेस आणि राजदमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सध्या झारखंडमध्ये या तिन्ही पक्षांचे संयुक्त सरकार आहे. राजकीय जानकार या घडामोडींना मुख्यमंत्री सोरेन यांच्याविरोधात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईशी जोडत आहेत. त्यांनी या भेटीचा अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सीएम सोरेन यांच्यामागे ईडीचा ससेमिरा 

जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने सोरेन यांना पाच वेळेस समन्स बजावले आहे. यानंतर सोरेन यांनीही आक्रमक पवित्रा घेत न्यायालयात दाद मागितली होती. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. यानंतर ईडी आपली कारवाई आणखी तीव्र करील अशी शक्यता असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मागील एक महिन्यापासून या प्रकरणात ईडीने काहीच हालचाली केलेल्या नाहीत.

PM Modi : राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’ ला मोदींकडून नवं नाव म्हणाले, लूट का बाजार

follow us